agriculture news in Marathi problems in horticulture crop insurance scheme Maharashtra | Agrowon

फळपीक विमा योजनेत त्रुटी, गोंधळ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 जून 2021

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी नव्याने काढलेल्या आदेशात हवामानाचे धोके २०१९ च्या आदेशाप्रमाणे कायम ठेवण्यात आले आहेत. तसेच नव्याने प्रीमियममध्ये वाढ करण्यात आली आहे.

सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी नव्याने काढलेल्या आदेशात हवामानाचे धोके २०१९ च्या आदेशाप्रमाणे कायम ठेवण्यात आले आहेत. तसेच नव्याने प्रीमियममध्ये वाढ करण्यात आली आहे. परंतु राज्यातील द्राक्ष, डाळिंब, केळी, मोसंबी, आंबा, संत्रा, सीताफळ या प्रमुख फलोत्पादक संघांनी विमा योजनेत अद्यापही गोंधळ कायम आहे, असे म्हणत त्यातील त्रुटींवर बोट ठेवले आहे. या योजनेत पारदर्शकता आणा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे कोषाध्यक्ष कैलास भोसले म्हणाले, की या योजनेत शेतकरी व शासनाचा पैसा वाया जात आहे. यात संगनमताने सुरू असलेली लूट टाळण्यासाठी पारदर्शकता आणावी. एका मंडळात १०-१५ गावे असताना हवामान केंद्र ठरावीक भागात उभारली गेली. त्यामुळे इतर गावांमधील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई नाकारली जाते. 

अखिल भारतीय डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे म्हणाले, की मृग आणि अंबिया बहरासाठी स्वतंत्र प्रिमियम आणि भरपाई ठरवली आहे. पण यात मृग बहरातील प्रीमियमध्ये शेतकऱ्यांवरच सर्वाधिक भार टाकला आहे. दुसरीकडे आंबिया बहरातही प्रीमियमची रक्कम दुप्पट-तिप्पट वाढवली आहे. शिवाय प्रत्येक जिल्हानिहाय प्रिमियम, भरपाईचे निकष बदललेले आहेत. ज्या जिल्ह्यात डाळिंबाचे क्षेत्र जास्त आहे. त्या जिल्ह्यात प्रीमियमचा हप्ता कमी आहे आणि ज्या जिल्ह्यात क्षेत्र कमी आहे, तिथे प्रीमियम वाढ आहे, कोणत्या आधारे ही नियम, निकष लावले. 

केळी फळबागायतदार संघ रावेरचे (जि. जळगाव) अध्यक्ष आर. टी. पाटील म्हणाले, की शेतकरी फक्त कमाल चार हेक्टर केळीखालील क्षेत्रासाठी विमा संरक्षण घेऊ शकतो. करपा, कुकुंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) या समस्यांसाठी विमा संरक्षण देण्यात आलेले नाही. वादळासंबंधीदेखील १ मार्च ते ३१ जुलै या कालावधीसाठी विमा संरक्षण आहे. पण खानदेशात केळीला बारमाही वादळाचा फटका बसतो. त्यामुळे निकष किंवा मानक बदलण्याची अपेक्षा आहे. 

जालन्याचे मोसंबी बागायतादर संघाचे अध्यक्ष पांडुरंग डोंगरे यांनी, ‘‘मंडलस्तरातील नुकसान हवामान धोक्यासाठी ग्राह्य धरले जात असेल तर एका मंडलात २०-२५ गावे असतात. पण एका गावात पाऊस पडतो आणि दुसऱ्या नाही. मग तिथल्या नुकसानभरपाईचं काय? स्थानिक भागातील हवामान केंद्राचा हवाला किंवा थेट त्या गावच्या पावसाच्या नुकसानीवरच भरपाई ठरली पाहिजे. 

सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्‍याम गट्टाणी म्हणाले, की सीताफळाला पहिल्यांदाच विमा कवच मिळाल्याने आनंद आहे. ऑक्टोबर महिन्यात पाऊस आला तर अधिक नुकसान झेलावे लागते. आता विम्यामुळे नुकसानभरपाईबाबत आम्हाला आशा निर्माण झाली आहे. 

महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे म्हणाले, की संत्रा पिकासाठी विमा कंपन्या ज्या ट्रिगर लावतात ते समजण्यापलीकडचे आहे. या ट्रिगरचा अभ्यास झाला पाहिजे. ट्रिगरमध्ये दोष असल्याने शेजारी-शेजारी असलेल्या दोन मौजातील शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याचे अनेकदा सिद्ध झालेले आहे. त्यामुळे ट्रिगर बनविण्यासाठी शेतकरी, शासन व कंपनीचे प्रतिनिधींची समिती नेमून काम व्हायला हवे. नुकसानीच्या काळात तहसीलदार, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, स्थानिक अधिकाऱ्यांची समिती तयार करून शेतात पाहणी व्हायला हवी. 

देवगड तालुका हापूस आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष अजित गोगटे यांनी फळपिक विमा योजना राबवताना मुख्य आधार असलेल्या हवामान केंद्रांचा ताळमेळ नसल्याचे सांगितले. ‘‘कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणणारी ट्रिगर्स नव्या फळपिक विमा योजनेत घुसविण्यात आले आहेत. ट्रिगर्स चुकविल्याने शेतकऱ्यांऐवजी कंपन्यांचा फायदा होतो,’’ असे कोकण हापूस आंबा 
उत्पादक व उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांनी दिली. 

पपईचा या योजनेत प्रथमच समावेश केला आहे. पपईला फक्त हेक्टरी ३५ हजार रुपये विमा संरक्षण रक्कम निश्‍चित आहे. ही योजना नोव्हेंबर २०२१ पासून लागू होईल. परंतु त्या वेळी पपईसमोरचे उष्णता, अतिपाऊस, आर्द्रता हे धोके संपलेले असतील. यामुळे ही योजना एप्रिल २०२१ पासून लागू करण्याची गरज होती. 

आंबा उत्पादकांनी मांडलेल्या सूचना 

  • हवामान केंद्रांची संख्या तातडीने वाढवा 
  • आंब्यासाठी ट्रिगर्सचा पुन्हा आढावा घ्यावा 
  • गारपिटीसाठी विमा सहभाग ऐच्छिक करावा 
  • पाऊस, उष्णता, थंडीच्या ट्रिगर अवधीत सुधारणा करावी 
  • हवामान केंद्रांची माहिती रोज उत्पादकाला द्यावी 

द्राक्ष बागायतदार संघ काय म्हणतो... 

  • पडलेल्या पावसाची नोंद दोन तासांत शेतकऱ्यांना एसएमएसने कळवावी 
  • ट्रिगर परस्पर अधिकारी व कंपन्यांनी बनवू नयेत 
  • ट्रिगर बनवताना फळपीक संघ, विद्यापीठांची मदत घ्यावी 
  • विमा कंपनीचे एजंट गावोगाव शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावेत 
  • नुकसानभरपाई ४८ तासांत शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात जमा व्हावी 

डाळिंब बागायतदार संघ काय म्हणतो 

  • प्रत्येक जिल्हानिहाय प्रीमियम वेगवेगळा ठेवायला नको 
  • मृग आणि आंबिया बहरासाठी सरसकट विम्याचा प्रीमियम सारखाच ठेवा. 
  • हवामानामुळेच कीड-रोगाचा फटका बसतो, त्याचाही विचार व्हावा 
  • शेतकऱ्यांवरील प्रीमियमचा राज्य सरकार आणि केंद्र सरकारने अतिरिक्त भार उचलावा 

मोसंबी बागायतदार संघ काय म्हणतो 

  • मंडलस्तरावर नुकसानभरपाईचा निकष नको 
  • वाढत्या आर्द्रतेमुळेही कीड-रोगाचा प्रादुर्भाव वाढतो, त्याचाही विचार भरपाईसाठी व्हावा. 
  • स्थानिक भागातील हवामान केंद्राच्या अंदाजाला ग्राह्य धरावे. 
  • प्रीमियमचा अतिरिक्त बोजा शेतकऱ्यांवर नको 

प्रतिक्रिया 
हवामानावर आधारित फळपीक विमा योजना ही फलोत्पादनातील अतिशय चांगली संकल्पना आहे. मात्र या योजनेतील निकष किचकट आहेत. त्यामुळे आपल्या सोयीपेक्षा या निकषातून गैरसोय होते, असा समज शेतकऱ्यांचा होतो. तो दूर करण्यासाठी फळबागांना सरसकट निकष न लावता प्रत्येक प्लॉटला डोळ्यासमोर ठेवून हवामानाची मानके वापरायला हवी. त्यादृष्टीने पायाभूत सुविधा उभारायल्या हव्यात. 
- विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनी 

करपा, कुकुंबर मोझॅक व्हायरससंबंधीच्या नुकसानीसाठी विमा संरक्षण या योजनेत दिलेले नाही. तसेच वादळही फक्त उन्हाळ्यात झाल्यास नुकसानभरपाई देय आहे. पण वादळ आता वर्षभरात कुठल्याही महिन्यात, ऋतूमध्ये येते. यामुळे वादळासंबंधीच्या नुकसानीची मानके किंवा निकष बदलले पाहिजेत. त्रुटी दूर करून सुधारित योजना लागू करावी. योजनेतील इतर बाबी मात्र स्वागतार्ह आहेत. 
- प्रेमानंद महाजन, केळी उत्पादक, तांदलवाडी (जि. जळगाव) 


इतर बातम्या
पशुचिकित्सा व्यवसायी आंदोलनाने पशुसेवा...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
अमरावती जिल्ह्यात १८३ जणांना ...अमरावती ः २०१७-१८ मध्ये फवारणीदरम्यान विषबाधेत...
पीकविम्यातील सूचनांचा केंद्राकडून...पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेत विमा कंपन्यांच्या...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साडेअकरा हजार...मुंबई ः राज्यातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे...
कोकणात काही ठिकाणी मुसळधार पुणे : कोकणात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस...
निविष्ठा वितरणातील अडचणींत लक्ष घालणार...पुणे ः राज्यात निविष्ठा वितरणात अडचणी येत असल्यास...
मराठवाड्यात सव्वा लाख हेक्टरवरील...औरंगाबाद : मराठवाड्यातील सात जिल्ह्यांतील १००३...
गोंदिया जिल्ह्यात विमाधारक शेतकरी...गोंदिया : गेल्या वर्षी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात...
साखरेचे किमान विक्री मूल्य तातडीने...कोल्हापूर : सध्या साखर उद्योग संकटात असून,...
वर्धा : पीककर्जप्रकरणी १६ बॅंकांना नोटीसवर्धा : पीककर्ज वाटपात दरवर्षी प्रमाणे या वर्षी...
आपद्‌ग्रस्त कुटुंबांना मिळणार पाच हजाररत्नागिरी : अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा चिपळूण,...
पूरबाधित कर्जदारांना सहकार्याची भूमिका...कोल्हापूर : जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे नागरिक व...
सेंद्रिय शेतीचे तंत्र अंगीकारा ः डॉ. ढवणबदनापूर, जि. जालना : अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित...
अकोल्यात ३७ हजार हेक्टरचे पंचनामेअकोला : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या झालेल्या...
रुग्णालयांच्या सुरक्षेचा तपशील दाखल करा...मुंबई : रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी आतापर्यंत...
परभणीत पशुधन पदविकाधारकांचे आंदोलनपरभणी ः पशुधन पदवीधारकांची जिल्हास्तरावर नोंदणी...
सातारा :बेसुमार वृक्षतोडीमुळे कोयनेचे...सातारा : कोयना धरण परिसरात मोठ्या प्रमाणात...
‘महसूल’ लोकाभिमुख करा ः आयुक्त गमेनाशिक : प्रशासनात चांगले काम केल्यास समाज देवत्व...
मोहोळ, उत्तर सोलापुरात बिबट्याची दहशत...सोलापूर ः चिंचोली, शिरापूर (ता. मोहोळ) अकोलेकाटी...
लासलगाव बाजार समितीत टोमॅटो लिलावास...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प.पू...