बारदान्याअभावी वाढल्या धान उत्पादकांच्या समस्या 

Problems of paddy growers due to lack of bardana
Problems of paddy growers due to lack of bardana

भंडारा ः धान उत्पादकांसमोरील अडचणी संपता संपत नसून मॉन्सूनोत्तर पावसानंतर आता खरेदी केंद्रावरील समस्यांनी त्यांना बेजार केल्याची स्थिती आहे. खरेदी केंद्रावर बारदान्याच्या उपलब्धतेची अडचण निर्माण झाल्याने येत्या काळात हमीभाव खरेदी प्रभावित होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून ६७ हमी केंद्रावर धान खरेदी सुरू आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनेच नियोजन व्यवस्थित नसल्याने संपूर्ण जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रावर अवस्था निर्माण झाली आहे. धान उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून सातत्याने बैठका घेण्यात आल्या. 

अनेक ठिकाणी नव्याने खरेदी केंद्राची मागणी करण्यात आली. प्रशासनाकडून ती पूर्ण करण्यात आली. परंतु, अनेक केंद्रांवर अवस्था कायम असल्याने धान उत्पादक हवालदिल झाले आहेत. पालांदूर येथील विविध सेवा सहकारी संस्थेमार्फत धान खरेदी केली जात आहे. या केंद्रांवर अडीच ते तीन हजार तांदळाच्या पोत्यांची खरेदी होते. त्याची माहिती ऑनलाइन जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना पाठविली जाते.

त्याआधारे दररोज होणारी आवक जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना कळत असतानासुद्धा त्यांच्याकडून बारदान्याच्या पुरवठ्याचे अपेक्षित धोरण राबविले जात नसल्याचा आरोप आहे. २५ हजार बारदान्याची मागणी करण्यात आली असताना पालांदूरला केवळ पाच हजारच बारदान्याचा पुरवठा करण्यात आला. अशा अपुऱ्या बारदान्याच्या पुरवठ्यामुळे दोन दिवस खरेदी होऊन तिसऱ्या दिवशी बंद पडली. असाच प्रकार जिल्ह्यातील इतरही केंद्रावर असल्याची ओरड आहे. 

मार्केटिंग अधिकारी प्रभारी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्याची बदली झाली. त्यानंतर नियुक्‍ती झालेले नवे अधिकारी रुजू होताच दीर्घ रजेवर गेले आहेत. त्यामुळे धान खरेदी रामभरोसे सुरू असल्याची स्थिती आहे. खरेदीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने धान उत्पादकांसमोरील अडचणी येत्या काळात सुटतील, अशी अपेक्षा नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com