नाशिक : दरवर्षीच्या प्रमाणे लाल कांद्याची होत असणारी बाजार समित्यांमधील आवक अजूनही मागणी
बातम्या
टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबवा : सिंघल
परभणी : टंचाई निवारणासाठी कृती आराखड्यातील उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश जिल्ह्याच्या पालक सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिव विनिता सिंघल यांनी संबंधित विभागांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पाणीटंचाईसह दुष्काळ निवारण, जलसंधारण कामांची आढावा बैठक घेण्यात आली. त्या वेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज, महापालिका आयुक्त रमेश पवार, अप्पर जिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

सिंघल म्हणाल्या, की जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य द्यावे. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष टंचाईग्रस्त गावांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची माहिती घ्यावी. टंचाईग्रस्त गावांत आणखी उपाययोजनांची गरज असल्यास त्या तातडीने कराव्यात. आवश्यक तेथे दीर्घकालीन उपाय करावेत.
महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत स्तरावरील टंचाईचा आढावा घेतानाच, जलसंधारण व रोजगार हमी योजनेची कामे, त्यावर मजुरांची उपस्थितीचीही माहिती त्यांनी घेतली. पाणीटंचाई निवारणासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचनाही सिंघल यांनी दिल्या.
- 1 of 920
- ››