agriculture news in Marathi, problems in service due to vacancies in veterinary department , Maharashtra | Agrowon

रिक्तपदांमुळे पशुवैद्यक सेवा पुरविण्यास अडचणी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 एप्रिल 2018

परभणी  ः जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध संवर्गातील महत्त्वाची पदे रिक्त आहेत. यामुळे जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांच्या जनावरांवर वेळेवर, योग्य औषधोपचार करणे अशक्य होत आहे. विविध आजारांवरील प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबविता येत नाही.

परभणी  ः जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध संवर्गातील महत्त्वाची पदे रिक्त आहेत. यामुळे जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांच्या जनावरांवर वेळेवर, योग्य औषधोपचार करणे अशक्य होत आहे. विविध आजारांवरील प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबविता येत नाही.

परभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यात राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे ८ आणि जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे ७८ अशी एकूण ८६ पशुवैद्यकीय उपचार केंद्र आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेचे श्रेणी १ चे ३० आणि श्रेणी २ चे ४८, तर राज्य शासनाच्या श्रेणी २ च्या ८ पशुवैद्यकीय उपचार केंद्रांचा समावेश आहे. साधारणातः पाच हजार पशुधनामागे एक पशुवैद्यक असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पशुधनाची संख्या साडेपाच लाखावर गेली आहे. परंतु अनेक तालुक्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणच्या पशुवैद्यकी उपचार केंद्रातील सह्यायक आयुक्त, पशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. 

शेतकरी, पशुपालंकांना पशुवैद्यकीय सल्ला तसेच आजारी जनावरांवर वेळेवर उपचार करणे अशक्य होत आहे. विविध आजारांवरील प्रतिबंधक लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविता येत नाही. सध्याच्या मनुष्यबळावर कामाचा ताण येत आहे. राज्य शासनाच्या पशुधन विभागांतर्गत जिल्ह्यात २० पदे मंजूर आहेत. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातील उपायुक्तांचे पद रिक्त आहे.

जिंतूर येथील सहायक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, सेलू येथील सहायक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, तसेच तालुक्यातील पशुधन पर्यवेक्षकाची ४ पदे रिक्त आहेत, पूर्णा येथील सहायक आयुक्त आणि पशुधन विकास अधिकारी, पाथरी आणि गंगाखेड येथील सहायक आयुक्तांचे पद रिक्त आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांची २२ पैकी ९ पदे रिक्त आहेत, तर पशुधन पर्यवेक्षकांची ५८ पैकी १५ पदे रिक्त आहेत. 

पंचायत समिती स्तरावरील ९ पदे तूर्त भरू नयेत असे शासन आदेश आहेत. पशुसंवर्धन गट ड मधील वृणोपचारकांची २४ पैकी पदे रिक्त आहेत. महत्त्वाच्या रिक्त पदांमुळे जिल्ह्यातील विशेषतः जिंतूर, गंगाखेड, पालम तालुक्यांतील डोंगराळ भागातील अाडवळणाच्या गावांतील तसेच जिल्ह्यातील गावातील पशुपालकांना जनावरांवर खासगी पशुवैद्यकाकडून उपचार करावे लागतात.

अनेकदा वेळेवर तसेच योग्य औषधोपचार न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना पशुधनास मुकावे लागत आहे. जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालकांच्या जनावरांवर वेळेवर उपचार करण्यासाठी तसेच पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी पशुसंवर्धन विभातील रिक्त पदे भरणे आवश्यक आहे.

इतर ताज्या घडामोडी
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...
पक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर  : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...
पुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...
‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...
जनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...
अमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती   ः जिल्ह्यातील चौदाही...
समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती  : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...
वनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...