द्राक्ष बागाईतदार संघाने मांडल्या केंद्रीय मंत्र्यांकडे समस्या

द्राक्ष निर्यातीबाबत या हंगामात गतवर्षाच्या तुलनेत कंटेनर भाडेवाढ चार पट‌ झाली आहे. ‌सर्व पॅकिंग साहित्याचे दर ३० ते ३५ टक्क्यांनी वाढले आहेत.
Problems with the Union Minister raised by the Grape Growers Association
Problems with the Union Minister raised by the Grape Growers Association

नाशिक : द्राक्ष निर्यातीबाबत या हंगामात गतवर्षाच्या तुलनेत कंटेनर भाडेवाढ चार पट‌ झाली आहे. ‌सर्व पॅकिंग साहित्याचे दर ३० ते ३५ टक्क्यांनी वाढले आहेत. द्राक्ष हंगामातील उत्पादन, वाहतूक व भाडेवाढीमुळे द्राक्ष उत्पादकांसमोर अडचणी निर्माण झाल्याने महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाने विविध समस्या मांडून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे लक्ष वेधले. या  हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थानिक वाहतूक खर्च प्रति कंटेनर नाशिक ते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या बंदरापर्यंतचा २८ हजारांवरून ४० हजारांवर गेला आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. केंद्र सरकारतर्फे विशेष कृषी उपज योजनेअंतर्गत द्राक्ष निर्यातीसाठी मिळणारे अनुदान हे सुरुवातीला ७ टक्के होते. ते कमी करून ५ टक्के व आता ३ टक्के इतके करण्यात आले आहे. हे अनुदान पूर्ववत सात टक्के करावे. २०२१ मध्ये ‘आरओडीटीईपी’ योजना वेळेत जाहीर न झाल्यामुळे निर्यातदारांकडून शेतकऱ्यांना द्राक्ष दर किलोमागे २५-३० रुपये कमी देण्यात आले. याचा थेट परिणाम चालू हंगामात होऊन द्राक्ष उत्पादकांचे नुकसान होऊ शकते हे निदर्शनास आणून दिले.   विशेषकरून वाहतूक खर्च वाढल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. केंद्र शासनाच्या वतीने द्राक्ष उत्पादकांसाठी विशेष निर्णय घ्यावे अशी मागणी भेटीप्रसंगी संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले, नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र निमसे, मानद सचिव बाळासाहेब गडा आदींनी निवेदनाद्वारे केली आहे. 

अधिवेशनात समस्या सोडविणार  येत्या संसदीय अधिवेशनात द्राक्ष उत्पादकांच्या प्रश्‍नांबाबत केंद्रीय  ‌मंत्री‌ नितीन गडकरी यांची  संघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत भेट घेऊन त्या-त्या विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत द्राक्षसंबंधी समस्या सोडविल्या जातील, असे ग्वाही भारती पवार यांनी शिष्टमंडळाला दिली आहे. 

मंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे केलेल्या मागण्या     बांगलादेशात द्राक्ष निर्यातीसाठी वातानुकूलित रेल्वे बोगीद्वारे महत्त्वाच्या बाजारपेठेशी संलग्न रेल्वे स्टेशनवर द्राक्षमाल उतरविण्याची सुविधा उपलब्ध करावी‌.     देशांतर्गत द्राक्षमाल वाहतुकीसाठी रेल्वे व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.      ‘बेदाणा’ हा कम्युडिटी ॲक्टमध्ये न धरत कृषी उत्पादने म्हणून ग्राह्य धरण्यात यावा. जेणेकरून शेतकऱ्यांची १८ टक्के सेवाकरातून सुटका होईल.      युरोपीय देशात निर्यातीत द्राक्ष मालाला आयात शुल्क लागू नये.     द्राक्षनिर्यात सुरू झाल्यानंतर कंटेनरचा तुटवडा भासून नये.       बंदरावर द्राक्षमालाचे वातानुकूलित कंटेनरला प्रतीक्षेत ठेवू नयेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com