Agriculture News in Marathi Problems with the Union Minister raised by the Grape Growers Association | Page 3 ||| Agrowon

द्राक्ष बागाईतदार संघाने मांडल्या केंद्रीय मंत्र्यांकडे समस्या

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 नोव्हेंबर 2021

द्राक्ष निर्यातीबाबत या हंगामात गतवर्षाच्या तुलनेत कंटेनर भाडेवाढ चार पट‌ झाली आहे. ‌सर्व पॅकिंग साहित्याचे दर ३० ते ३५ टक्क्यांनी वाढले आहेत.

नाशिक : द्राक्ष निर्यातीबाबत या हंगामात गतवर्षाच्या तुलनेत कंटेनर भाडेवाढ चार पट‌ झाली आहे. ‌सर्व पॅकिंग साहित्याचे दर ३० ते ३५ टक्क्यांनी वाढले आहेत. द्राक्ष हंगामातील उत्पादन, वाहतूक व भाडेवाढीमुळे द्राक्ष उत्पादकांसमोर अडचणी निर्माण झाल्याने महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाने विविध समस्या मांडून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे लक्ष वेधले.

या  हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थानिक वाहतूक खर्च प्रति कंटेनर नाशिक ते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या बंदरापर्यंतचा २८ हजारांवरून ४० हजारांवर गेला आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

केंद्र सरकारतर्फे विशेष कृषी उपज योजनेअंतर्गत द्राक्ष निर्यातीसाठी मिळणारे अनुदान हे सुरुवातीला ७ टक्के होते. ते कमी करून ५ टक्के व आता ३ टक्के इतके करण्यात आले आहे. हे अनुदान पूर्ववत सात टक्के करावे. २०२१ मध्ये ‘आरओडीटीईपी’ योजना वेळेत जाहीर न झाल्यामुळे निर्यातदारांकडून शेतकऱ्यांना द्राक्ष दर किलोमागे २५-३० रुपये कमी देण्यात आले. याचा थेट परिणाम चालू हंगामात होऊन द्राक्ष उत्पादकांचे नुकसान होऊ शकते हे निदर्शनास आणून दिले.  

विशेषकरून वाहतूक खर्च वाढल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. केंद्र शासनाच्या वतीने द्राक्ष उत्पादकांसाठी विशेष निर्णय घ्यावे अशी मागणी भेटीप्रसंगी संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले, नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र निमसे, मानद सचिव बाळासाहेब गडा आदींनी निवेदनाद्वारे केली आहे. 

अधिवेशनात समस्या सोडविणार 
येत्या संसदीय अधिवेशनात द्राक्ष उत्पादकांच्या प्रश्‍नांबाबत केंद्रीय  ‌मंत्री‌ नितीन गडकरी यांची  संघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत भेट घेऊन त्या-त्या विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत द्राक्षसंबंधी समस्या सोडविल्या जातील, असे ग्वाही भारती पवार यांनी शिष्टमंडळाला दिली आहे. 

मंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे केलेल्या मागण्या
    बांगलादेशात द्राक्ष निर्यातीसाठी वातानुकूलित रेल्वे बोगीद्वारे महत्त्वाच्या बाजारपेठेशी संलग्न रेल्वे स्टेशनवर द्राक्षमाल उतरविण्याची सुविधा उपलब्ध करावी‌.
    देशांतर्गत द्राक्षमाल वाहतुकीसाठी रेल्वे व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. 
    ‘बेदाणा’ हा कम्युडिटी ॲक्टमध्ये न धरत कृषी उत्पादने म्हणून ग्राह्य धरण्यात यावा. जेणेकरून शेतकऱ्यांची १८ टक्के सेवाकरातून सुटका होईल. 
    युरोपीय देशात निर्यातीत द्राक्ष मालाला आयात शुल्क लागू नये.
    द्राक्षनिर्यात सुरू झाल्यानंतर कंटेनरचा तुटवडा भासून नये.  
    बंदरावर द्राक्षमालाचे वातानुकूलित कंटेनरला प्रतीक्षेत ठेवू नयेत. 

 


इतर अॅग्रो विशेष
अंड्यात खरंच भेसळ असते का?अंड्याचे सर्वात बाहेरील आवरण म्हणजे त्याचे कवच...
कुक्कुटपालनात रोगनियंत्रण महत्वाचे माणसांप्रमाणे जनावरांमध्ये तसेच पशु-पक्ष्यांनाही...
बँकांनी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे लिलाव...जयपूर - राजस्थानमधील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या...
दहावीपर्यंत शिक्षण असून हुकूमचंद तयार...दहावीनंतर शिक्षणाला रामराम ठोकणारे हुकूमचंद...
 ‘आरओ प्लांट’ अन् सेंद्रिय स्लरीनिर्मितीक्षेत्र ६५ एकर असल्याने मजूरटंचाईवर मात...
भारताच्या गहू अनुदान धोरणावर...भारत सरकारकडून देशांतर्गत साखर उद्योगासाठी (Sugar...
जनावरांची वार का अडकते?जनावर व्यायल्यानंतर साधारणतः वार सहा ते आठ...
शेतमालाची निर्यात गाठणार ५० अब्ज...२०२२ या आर्थिक वर्षात भारतीय शेतमाल निर्यात (...
राज्यात हिरवी मिरची १२०० ते ६५०० रुपयेपरभणीत ४००० ते ६५०० रुपये परभणी ः येथील पाथरी...
जादा दराने खतांची विक्री सात...नाशिक : रब्बी हंगामात शेतकऱ्यांची खतांना मागणी...
महाराष्ट्रात ३५ धान्य आधारित इथेनॉल...वृत्तसेवा - केंद्र सरकारने (Central Government)...
रशियासाठी निर्यातीच्या द्राक्ष दराचा...पुणे - महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने...
गावरान कि ब्रॉयलर चवीला कोण जबरदस्त?कोंबडीची पचनसंस्था कशी कार्य करते. तुम्ही कोंबडी...
थंडीत खा अंडी रोज सकाळी उठल्यावर कसला नाष्टा करावा जो कि...
गुणवत्तापूर्ण आंब्याला मिळवली ग्राहक...मालगुंड (ता. जि. रत्नागिरी) येथील विद्याधर...
ट्रायकोडर्मा निर्मितीसाठी शेतात उभारली...राहुल रसाळ यांनी शेत परिसरात छोटेखानी प्रयोगशाळा...
टिळा तेजाचामराठी भाषेला मातीतल्या कवितेचे लेणं चढवणाऱ्या कवी...
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला....
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज किनवट बाजारात...
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी...