उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक निवडीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक निवडीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून (ता. १८) सुरू झाली आहे. सोमवारपर्यंत (ता.२४) अर्ज दाखल केले जाणार आहेत. २० फेब्रुवारीला प्रत्यक्ष मतदान व २१ फेब्रुवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.
The process of applying for the election of Osmanabad District Bank Director is underway
The process of applying for the election of Osmanabad District Bank Director is underway

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक निवडीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून (ता. १८) सुरू झाली आहे. सोमवारपर्यंत (ता.२४) अर्ज दाखल केले जाणार आहेत. २० फेब्रुवारीला प्रत्यक्ष मतदान व २१ फेब्रुवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

अर्ज प्राप्त होतील, तसे दररोज सायंकाळी ५ वाजता इच्छुकांची नावे जाहीर होतील. मंगळवारपासून (ता. २५) अर्जांच्या छाननीला सुरुवात होईल. २७ जानेवारी ते १० फेब्रुवारीदरम्यान सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत इच्छुकांना आपले अर्ज मागे घेता येतील. उमेदवारांना चिन्हांचे वाटप व अंतिम यादीचे प्रकाशन ११ फेब्रुवारीला होईल. २० फेब्रुवारी रोजी मतदान होईल. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होईल. त्याच दिवशी निकालही घोषित केले जातील. 

राजकीय परिस्थिती बदलल्याने बँक निवडणुकीत समीकरणे कशी राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. महाविकास आघाडी घटक पक्षांमधील एकी पाहायला मिळणार का? भाजपबरोबर कोण सलगी करणार? हेही स्पष्ट होईल. जिल्हा बँकेची ही निवडणूक जिल्ह्याच्याही राजकारणाची दिशा ठरविण्यासाठी महत्त्वाची ठरेल. 

पंधरा संचालकांसाठी निवडणूक

पंधरा संचालकांसाठी ही निवडणूक होईल. यामध्ये विकास सेवा सोसायटी संस्था गटासाठी आठ जागा, महिलासाठी दोन जागा, अनुसूचित जाती-जमातीसाठी एक, इतर मागासवर्गीय एक, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी एक, इतर शेती संस्थांसाठी एक, नागरी बँकासह खरेदी विक्री संघ, सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या आदींसाठी एक जागा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com