सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला) येथील शेतकऱ्यांनी आंबा, काजू या मुख्य पिकांन
अॅग्रो विशेष
पदवीच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ
कृषी व मत्स्य विद्याशाखेच्या पदवी अभ्यासक्रमाची स्थगित करण्यात आलेली थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश प्रक्रियेची पुन्हा सुरूवात झाली आहे.
पुणे ः कृषी व मत्स्य विद्याशाखेच्या पदवी अभ्यासक्रमाची स्थगित करण्यात आलेली थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश प्रक्रियेची पुन्हा सुरूवात झाली आहे. कृषी व शिक्षण संशोधन परिषदेने दुसऱ्या व तिसऱ्या प्रवेश फेरीची यादी जाहीर केली आहे. आज (ता.३०) सायंकाळनंतर तिसऱ्या फेरीस सुरवात होणार असून रिपोर्टिंगचा कालावधी १ ते ३ डिसेंबर सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत आहे. विद्यार्थ्यांनी या प्रवेश प्रक्रियेची माहिती घेऊन पुढील प्रवेश घ्यावा, असे आवाहन कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या सूत्रांनी केले.
राज्यात चार कृषी विद्यापीठांमध्ये कृषी विद्याशाखेची ९४ महाविद्यालये कार्यरत आहेत. यापैकी १८ महाविद्यालये शासकीय, २ अनुदानित आणि खासगी ७४ महाविद्यालये कायमस्वरूपी विना अनुदान तत्त्वावरील आहेत. राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत ३४, अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत २५, परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत २७ आणि दोपोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत ८ अशी विद्यापीठनिहाय महाविद्यालये आहेत. कृषी पदवी अभ्यासक्रम चार वर्षे कालावधीचा असून या महाविद्यालयांमध्ये थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश क्षमता १ हजार ९६९ आहे.
राज्यातील चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत चालू वर्षाच्या शैक्षणिक वर्षांमधील पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षातील प्रवेश प्रक्रियेतर्गंत नियोजित वेळापत्रकानुसार ७ सप्टेंबर २०२० रोजी पहिली प्रवेश वाटप फेरी जाहीर करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर रोजी सामाजिक आणि शैक्षणिक मागासर्वगाच्या (एसईबीसी) आरक्षणास अंतरिम स्थगिती दिली असल्याने पुढील प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती.
या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबरला चालू वर्षीच्या शैक्षणिक वर्षातील ९ सप्टेंबरनंतरची सर्व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया ‘एसईबीसी’ प्रवर्गातून प्रवेशाकरिता अर्ज केले असतील. परंतु त्यांना प्रवेश देण्यात आले नसतील अशा ‘एसईबीसी’ वर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात यावे, असे सूचित केले आहे. त्यानुसार कृषी व मत्स्य विद्याशाखेच्या पदवी अभ्यासक्रमात थेट दुसऱ्या प्रवेश प्रक्रिया फेरीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
कृषी तंत्र निकेतन पदविकाधारकांसाठी पदवी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक.
दुसऱ्या यादीची प्रसिध्दी: ३० नोव्हेंबर (सायंकाळनंतर)
रिपोर्टिंगचा कालावधी: १ ते ३ डिसेंबर
तिसऱ्या यादीची प्रसिध्दी: ७ डिसेंबर (सायंकाळनंतर)
रिपोर्टिंगचा कालावधी: ८ ते १० डिसेंबर
केंद्रनिहाय रिक्त जागांची प्रसिध्दी: ११ डिसेंबर
केंद्रनिहाय ऑनलाइन प्रवेश फेरी: १४ ते १५ डिसेंबर
वर्ग सुरु होण्याचा तारीख : १६ डिसेंबर
- 1 of 655
- ››