Agriculture news in marathi In the process of storage of agricultural produce Creation of equipment for detecting rot | Agrowon

शेतीमालाची सड शोधणाऱ्या उपकरणाची निर्मिती 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 जुलै 2021

कांदे, बटाटे, आंबा यांसह विविध फळे व तत्सम विविध कृषी उत्पादनांची काढणीपश्‍चात साठवणूक प्रक्रियेत वातावरण बदलांमुळे सडण्याची प्रक्रिया सुरू होते.

नाशिक : कांदे, बटाटे, आंबा यांसह विविध फळे व तत्सम विविध कृषी उत्पादनांची काढणीपश्‍चात साठवणूक प्रक्रियेत वातावरण बदलांमुळे सडण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर वेगवेगळ्या घटकांनुसार विशिष्ट वायू बाहेर पडण्यास सुरुवात होते. त्यामुळे थोडेसे तापमान व थोडीशी आर्द्रता वाढते, अशा विविध वैशिष्ट्यपूर्ण परिमाणांचा अभ्यास करून त्यावर आधारित विविध सेन्सर्स वापरून आयआयओटी (IIOT) तंत्रज्ञानावर आधारित ‘किसान मित्रा ओपी-०१’ हे उपकरण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी यांनी विकसित केले आहे.

शेतीमालाच्या सड सुरुवात होताच परिमाणांचे विश्‍लेषण करून पूर्वसूचना देणारे व मोबाइलवर सावध करणारा विस्तृत संदेश देणारे उपयुक्त उपकरण आहे. 
प्रामुख्याने याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.

शेतकरी रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा काढणीपश्‍चात साठवून ठेवतात. तर पुढे टप्प्याटप्प्याने त्याची विक्री करतात. मात्र साठवणूक केल्यानंतर कांदा वातावरणीय बदलांमुळे सडून नुकसान वाढते. यावर पर्याय म्हणून कांद्याची होणारी सड शोधून सूचना देणारे उपकरण फायदेशीर ठरणार आहे. चुकीच्या साठवणूक पद्धतीमुळे साधारण ३० ते ४० टक्के कांदा सडून जातो. चाळीमध्ये कांदा सडण्यास सुरुवात झाल्यानंतर ते शोधणे अशक्य असते. जर कांद्याची होणारी सड वेळीच लक्षात आल्यास कांदा सडण्यापासून वाचविता येणार आहे. 

या उपकरणाचे प्रात्यक्षिक नाफेडचे नवी दिल्लीचे संचालक अशोक ठाकूर, माजी कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे, लासलगाव बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांना दाखविण्यात आले. नाफेडच्या वतीने हे उपकरणाचा वापर करण्याचे आश्‍वासन ठाकूर यांनी दिले. डॉ. कुलकर्णी यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे अतिरिक्त संचालक म्हणून काम पाहिलेले आहे. शेतीमालाच्या साठवणुकीतील सडण्याची प्रक्रिया सुरू झाल्याबरोबर त्वरित सूचना मिळाली, तर चांगला शेतीमाल बाजूला काढून पुढील नुकसान टाळता येणे शक्य आहे. या विचारांतून हे तंत्रज्ञान विकसित केल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी रवी अमृतकर, प्रा. तिवारी यांनी मदत केलेली आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
७२ तासांची सक्ती नको ः आयुक्तपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा...
पीकविमा योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळपुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेच्या माध्यमातून...
अखेर ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखलअमरावती : राज्य शासनाने केलेल्या करारानुसार इफ्को...
पळवाटांमुळे पीकविमा भरपाई दुरापास्तशेतकऱ्यांकडून पीकविम्याचा हप्ता भरतेवेळी...
विमा कंपन्यांबाबत सरकारची बोटचेपी भूमिकापीकविमा योजनेमुळे शेतकऱ्यांऐवजी पीकविमा कंपन्याच...
मराठवाड्यात एक लाख हेक्टरवर पीकनुकसानऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांत...
पावसाची उसंत, सावरण्याची धडपड सुरु पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
विमा कंपन्यांचा राज्यभर सावळागोंधळ पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेतील खासगी विमा...
कोकणात मुसळधारेची शक्यता पुणे : कोकणसह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी...
सोयाबीनने गाठला दहा हजारांचा ऐतिहासिक...अकोला/लातूर ः गेले काही महिने सोयाबीनला चांगला दर...
विदर्भात कृषी अधिकाऱ्यांनीच घेतले विमा...नागपूर ः जिल्हास्तरावर आमचे कार्यालय आहे, हे...
मराठवाड्यात पीकविम्याबाबत शेतकऱ्यांसमोर...औरंगाबाद : पीकविमा उतरविण्याची सोय त्यासाठी जागर...
खानदेशात पीकविमा कंपनीचे कार्यालयच नाही जळगाव : खानदेशात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
केव्हीकेने दाखवली ‘वीडर’ची पॉवर, छोट्या...मजूरटंचाई व वाढलेले मजूरदर लक्षात घेऊन ममुराबाद (...
दिशा कार्यक्षम पूर व्यवस्थापनाची!महाराष्ट्र देशी सध्या अतिवृष्टी आणि ...
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
पीक विम्यात चुकीचे प्रकार खपवून घेणार ...नाशिक: पीकविमा कंपन्यांकडून पाच पाच जिल्ह्यांसाठी...
केंद्राच्या काळ्या कायद्यांची आम्हाला...नवी दिल्ली ः कायद्याच्या प्रक्रियेतून न आलेल्या...
धरण क्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : तीन दिवसांपासून राज्यातील धरणक्षेत्रात...