Agriculture news in marathi; Processing of 10,000 metric tonnes of farmland in Vichur MIDC | Agrowon

विंचूर एमआयडीसीत १० हजार मेट्रिक टन शेतमालावर प्रक्रिया
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

नाशिक  : निफाड तालुक्यातील विंचूर येथे सुरू झालेल्या अन्नप्रक्रिया उद्योगाचा प्रकल्प उभा राहिला आहे. या ठिकाणी प्रतिवर्षी सुमारे १० हजार मेट्रिक टन शेतमालावर प्रक्रिया करून सदर शेतमाल निर्यात केला जाणार आहे. या प्रकल्पास माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी एमआयडीसीचे अधिकारी आणि शेतकऱ्यांसमवेत बुधवार (ता. १४) विंचूर येथील अन्नप्रक्रिया उद्योगाला भेट दिली. या वेळी भुजबळ यांनी या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकारी व कंपनीच्या समन्वयकांशी चर्चा केली.

नाशिक  : निफाड तालुक्यातील विंचूर येथे सुरू झालेल्या अन्नप्रक्रिया उद्योगाचा प्रकल्प उभा राहिला आहे. या ठिकाणी प्रतिवर्षी सुमारे १० हजार मेट्रिक टन शेतमालावर प्रक्रिया करून सदर शेतमाल निर्यात केला जाणार आहे. या प्रकल्पास माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी एमआयडीसीचे अधिकारी आणि शेतकऱ्यांसमवेत बुधवार (ता. १४) विंचूर येथील अन्नप्रक्रिया उद्योगाला भेट दिली. या वेळी भुजबळ यांनी या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकारी व कंपनीच्या समन्वयकांशी चर्चा केली.

या प्रकल्पामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची यंत्रसामग्री बसवून शेतमालावर प्रक्रिया करण्यात येत आहे. या अन्नप्रक्रिया उद्योगासाठी सुमारे १०० कोटी गुंतवणूक करण्यात येत असून, हा आशिया खंडातील सर्वात मोठा अन्नप्रक्रिया उद्योग या ठिकाणी साकारला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने पांढरा कांदा, मका, वटाणा, गाजर, लसूण, फ्लॉवर इत्यादी शेतमालावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.

या वेळी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता उईके, उपअभियंता नितीन पाटील, एस. एस. पाटील हे उपस्थित होते. या अन्नप्रक्रिया प्रकल्पात शेतीमालाबरोबरच प्रामुख्याने कांदा निर्जलीकरण प्रकल्प साकारण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे १० हजार शेतकऱ्यांबरोबर करार करण्यात आला आहे. शिवसाई एक्स्पोर्ट अँड पॉलिशेट्टी सोमासुंदरम ऍग्रो एक्स्पोर्ट कंपनीचे संचालक सांबाशिव राव, नरेश चौधरी, मुख्य समन्वयक शिवदास आव्हाड, व्यवस्थापकीय संचालक सुधाकर रेड्डी यांनी उपस्थितांना या प्रकल्पाबद्दल माहिती दिली. 

कांद्याची साठवणूक व प्रक्रिया केली जाणार 
लासलगाव व येवला हे कांद्याचे आगार आहे. राज्यात पिकणाऱ्या कांद्याच्या उत्पादनापैकी ६० टक्के उत्पादन या भागातून होत असते. मात्र, कांद्याची साठवणूक केली जात नसल्यामुळे मार्केटमध्ये एकाच वेळी सर्व माल येतो त्यामुळे कांद्याचे भाव गडगडत असतात. या ठिकाणी शेतमालाचे १० हजार टन क्षमतेचे गोडाऊन उभारण्यात आले आहे. यामध्ये टिकाऊ माल जास्त काळ साठवला जाईल तसेच कांद्यावर त्वरित प्रकिया केली जाईल, त्यामुळे कांद्याला योग्य भाव मिळणार असून कांद्याचे नुकसान टळणार आहे. 

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात टोमॅटो, फ्लॉवरची आवक कमी; दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
अमेरिकन लष्करी अळीविषयी जागृती,...मक्यावरील लष्करी अळी (शा. नाव - स्पोडोप्टेरा...
संजीवकांचा वापर संतुलितपणेच व्हावानाशिक : द्राक्षबागेत आवश्यकतेनुसार रासायनिक...
‘महावितरण’कडून शेतकऱ्यांना अंदाजपंचे...नाशिक : अंबड परिसरात महावितरणकडून कृषी पंपाचे...
खरीप पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...जळगाव ः जिल्ह्यात खरिपातील पीकविमा योजनेला चांगला...
खानदेशातील अनेक सिंचन प्रकल्प भरलेजळगाव ः खानदेशातील अवर्षणप्रवण भागातील काही...
निष्पक्ष निवडणुकीसाठी यंत्रणा सज्जअकोला ः विधानसभा निवडणुकीच्‍या अनुषंगाने जिल्‍हा...
मेळघाटातील शेतकऱ्यांना जाणून घ्यायचेय...औरंगाबाद : मेळघाटातील शेतकरी मराठवाडा आणि...
निकृष्ट बंधाऱ्याप्रकरणी तिघांवर गुन्हे...गडचिरोली ः चार महिन्यांपूर्वी बांधण्यात...
अनुदानावरील पशुखाद्य पुरवठ्यासाठी उद्या...नागपूर ः पशुखाद्याच्या तुटवड्यामुळे अडचणीत...
पूर्वहंगामी कापूस पिकाला पावसाचा फटकाजळगाव ः खानदेशातील पूर्वहंगामी कापूस पिकाला सततचा...
रयतच्या योगदानातून इतिहास घडेल ः शरद...सातारा: त्यागाचा विचार तत्कालीन पिढीत घडविण्यात...
सरकार सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका...नगर  ः दोन वेळचा घास भरवणाऱ्या...
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दिब्रिटो...लातूर :  उस्मानाबाद येथे होणाऱ्या आगामी...
केळीच्या पिल बागेतील सिगाटोका रोगाचे...केळी पिकावर दरवर्षी पिवळा करपा म्हणजेच ‘सिगाटोका...
गव्हावरील किडीच्या नियंत्रणासाठी सहजीवी...मोंटाना राज्य विद्यापीठातील कृषी महाविद्यालयातील...
साताऱ्यातील तीन तालुक्यांत पाणीटंचाई...सातारा : गेल्या दोन दिवसांत माण, खटाव, फलटण या...
चाळीसगाव तालुक्‍यात अद्यापही टॅंकर सुरूचजळगाव  ः जिल्ह्यात यंदा पावसाने नाबाद ११५.५...
पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ४२ कोटींचे...पुणे : गेल्या जुलै व ऑगस्ट महिन्यांत...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची लागवड...नाशिक  : महाराष्ट्रात होणारी खरीप कांद्याची...