agriculture news in Marathi processing on 45 lac liter milk by GOKUL Maharashtra | Agrowon

`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 मे 2020

लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून (गोकुळ) राज्यातील सहा दूध संघातील सुमारे ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया करून पावडर व लोणी उत्पादन करण्यात आले आहे.

कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून (गोकुळ) राज्यातील सहा दूध संघातील सुमारे ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया करून पावडर व लोणी उत्पादन करण्यात आले आहे. अतिरिक्त ठरलेले दूध शासनाने खरेदी करून ते ‘गोकुळ'कडे पाठवले होते. 

दरम्यान, दूध पावडर, लोणीचे उत्पादन वाढले असले तरी बाजारातील मागणीही ठप्प आहे आणि उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारातील दरही कमी असल्याने पावडर आणि लोणीही ‘गोकुळ’च्या गोदामातच पडून आहे. 

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून लॉकडाउन पुकारण्यात आला. त्याचा सर्वाधिक फटका दुग्ध व्यवसायाला बसला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी राज्यातील अतिरिक्त दूध खरेदी करण्याचा शासनाने निर्णय घेतला. ३१ मेपर्यंत हे दूध खरेदी केले जाणार आहे. खरेदी केल्या जाणाऱ्या दुधापासून पावडर, लोणी उत्पादन करण्याचे निश्‍चित झाले. पण खरेदी केलेल्या दुधाच्या तुलनेत त्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा कमी असल्याने शासनाने याची जबाबदारी ‘गोकुळ' वर सोपवली होती. 

‘गोकुळ’ कडे दैनंदिन पाच लाख लिटरवर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. संघाचे सद्याचे संकलन कायम आहे पण विक्रीत घट झाली आहे. त्यामुळे संघाचेचे दिड ते दोन लाख लिटर दूध अतिरिक्त आहे. त्याचबरोबर बारामती दूध संघ, पुणे जिल्हा दूध संघ, शिवामृत-अकलूज, फत्तेसिंग नाईक संघ-शिराळा या संघाकडील दूध ‘गोकुळ’ कडे प्रक्रियेसाठी पाठवले जात होते. 

आतापर्यंत या संघाकडून सुमारे ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्यात आली आहे. या दुधापासून ‘गोकुळ' ने ३८० टन पावडर तर १९० टन लोणी उत्पादित केले आहे. गुजरातच्या आनंद डेअरीत दर आठवड्याला एनसीडीएफ मार्फत लोणी व पावडरचा लिलाव होतो, पण गेल्या दोन आठवड्यात एक रूपयाचाही विक्री या लिलावातून झालेली नाही. त्यामुळे पावडर आणि लोणीही पडून आहे. 


इतर अॅग्रो विशेष
कृषी पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटींचा...नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतमाल काढणीपश्‍चात...
अजून एक `लातूर पॅटर्न’कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर एप्रिल, मे, जून...
सत्त्वयुक्त उत्पादनांची हवी कृषी...माणसाच्या उपभोगासाठी उपयुक्त असलेली जैवविविधता...
सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच, पुरस्थिती...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागलेकोल्हापूर :  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस...
कृषी योजनांचे उद्दिष्ट तीन...नगर ः कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठी देण्यात...
राज्यातील २५ लाख खातेदारांना साडेसोळा...मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
दूध भुकटी योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
जिल्हा बँकांना शासकीय व्यवहार करण्यास...मुंबई : शासकीय निधीची सुरक्षितता लक्षात घेऊन...
राज्यात सावकारांकडून दरमहा १०० कोटींचे...सोलापूर : राज्यात मागील पाच वर्षांत तब्बल ७५२...
नियमनमुक्तीला पुणे महापालिकेचा हरताळपुणेः एकीकडे केंद्र आणि राज्य शासन शेतमाल बाजार...
विदर्भात वादळी पावसाचा अंदाजपुणे: कोकण, घाटमाथ्यावर मॉन्सूनचा पाऊस सक्रिय...
मराठवाड्यात सोयाबीनची सरासरीपेक्षा अधिक...औरंगाबाद : खरिपाच्या पेरण्या जवळपास ८३ टक्के...
कृषी व्यापार अध्यादेशामुळे दिलासापुणे: केंद्राने काढलेल्या ‘कृषी उत्पादने व्यापार...
खानदेश, मराठवाडा, वऱ्हाडात पावसाच्या सरीपुणे : मॉन्सूनचा पाऊस सक्रिय असल्याने कोकणासह...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
‘सरफेसी' कायदा आहे तरी काय? दिवसेंदिवस बॅंकांच्या थकीत रकमेत वाढ दिसून येत...
लष्करी’ हल्लाखरीप हंगामाच्या सुरवातीलाच राज्यात मका पिकावर...
कोकणात जोरदार पावसाची शक्यता पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने गेल्या काही...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू...