फळे, भाज्यांवर प्रक्रिया ठरेल फायदेशीर ः बिराजदार

Processing of fruits, vegetables will be beneficial: Birajdar
Processing of fruits, vegetables will be beneficial: Birajdar

सोलापूर : "फळे व भाजीपाल्याच्या थेट विक्रीपेक्षाही त्यावर प्रक्रिया करणे सोपे आणि अधिकचा नफा मिळविणेही फायदेशीर आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी विचार करावा,'''' असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी केले. 

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने ग्रामीण भागातील युवकांसाठी आयोजित कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यमांतर्गत ‘फळे व भाजीपाला प्रक्रियेचे महत्त्व'' या विषयावर बिराजदार बोलत होते. ‘आत्मा’चे उपसंचालक मदन मुकणे, कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ प्रा. दिनेश क्षीरसागर उपस्थित होते.

बिराजदार म्हणाले, "फळे व भाज्या नाशवंत आहेत. काढणीनंतर लवकरात लवकर त्या बाजारात पोचवणे आवश्‍यक आहे. काढणीनंतर जसजसा वेळ लागेल, तसतसा त्यांचा ताजेपणा कमी होऊन फळे, भाज्या खराब होऊ लागतात. बाजारपेठेत एकाच वेळी त्यांची भरपूर आवश्‍यकता असल्यामुळे अल्प भावाने त्यांची विक्री करावी लागते. त्यामुळे त्यापासून मिळणारा नफा हा अत्यल्प, नगण्य असतो. या शिवाय न विकल्यास तो माल साठवणीच्या सोयीच्या अभावामुळे सडतो व वाया जातो. कधी कधी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण असते. त्यामुळे फळे, भाज्यांवर प्रक्रिया केल्यास किंमत चांगली मिळू शकते.'''' 

‘‘प्रक्रियायुक्त पदार्थांची परदेशात निर्यात करून उत्पन्न मिळेल. हे पदार्थ विक्रीसाठी कितीही दूर नेता येतात. या उद्योगामुळे बेरोजगारीच्या प्रश्नाला काही प्रमाणात आळा बसेल’’, असेही  बिराजदार म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com