Agriculture news in marathi processing machines used for the processing of dairy products | Agrowon

दुग्धजन्य प्रक्रिया पदार्थांच्या निर्मितीसाठी यंत्रे

सचिन शेळके
बुधवार, 15 एप्रिल 2020

पारंपरिकरीत्या दुधापासून खवा, पनीर, दही, लस्सी अशी विविध प्रक्रिया उत्पादने बनवली जातात. मात्र, त्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासते. त्याच प्रमाणे अनेक दही बनवण्यासारख्या अनेक प्रक्रियांवर वातावरणातील अनेक घटकांचा परिणाम होतो. परिणामी कमी वेळेत, कमी मनुष्य बळासह उत्तम दर्जाची उत्पादने बनवण्यासाठी आधुनिक यंत्रे उपयुक्त ठरतात.
 

पारंपरिकरीत्या दुधापासून खवा, पनीर, दही, लस्सी अशी विविध प्रक्रिया उत्पादने बनवली जातात. मात्र, त्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासते. त्याच प्रमाणे अनेक दही बनवण्यासारख्या अनेक प्रक्रियांवर वातावरणातील अनेक घटकांचा परिणाम होतो. परिणामी कमी वेळेत, कमी मनुष्य बळासह उत्तम दर्जाची उत्पादने बनवण्यासाठी आधुनिक यंत्रे उपयुक्त ठरतात.

मलई काढणारे यंत्र (क्रिम सेपरेटर) 

 • दुधामधील स्निग्धांश(क्रिम) वेगळे करण्यासाठी क्रिम सेपरेटर मशिन वापरतात. या यंत्रामध्ये सेंट्रिफ्युगेशन पद्धतीने दुधातील क्रीम वेगळे केले जाते. या यंत्रामध्ये एका बाजूने दूध टाकले जाते, तर दुसऱ्या बाजूने मलई आणि मलईविरहित दूध (स्किम मिल्क) वेगळे बाहेर पडते. हे यंत्र ३ फेज व ३८० व्होल्ट ऊर्जेवर चालते. २५ लिटर क्षमतेच्या यंत्राची किंमत आठ हजार रुपयांपासून सुरू होते.
 • यंत्राचे बहुतांश भाग स्टेनलेस स्टीलपासून बनलेले असून, काही भाग माईल्ड स्टिल (एम.एस. ) धातूचे बनले आहेत. यंत्राचे वजन ५५ किलो आहे.
 • अशाच प्रकारचे पण पूर्णपणे स्वयंचलित व सिंगल फेजवर चालणारे यंत्र उपलब्ध आहे. त्याची किंमत २० हजारांपासून पुढे आहेत. काढलेल्या मलईचा वापर विविध कारणांसाठी करता येतो. अनेक ठिकाणी त्यापासून तूप बनवले जाते.

खवा तयार करण्याचे यंत्र 

 • दूध तापवून त्यातील पाण्याचे प्रमाण कमी केल्यानंतर खव्याची निर्मिती केली जाते. खवा हा पांढरा किंवा फिकट तपकिरी रंगाचा असतो. खव्याची मागणी ही प्रामुख्याने मिठाई उद्योगासाठी असते. पारंपरिक पद्धतीमध्ये खव्याच्या निर्मितीसाठी दूध तापवतेवेळी दूध ढवळण्याचे काम सातत्याने करावे लागते. त्यासाठी एक माणूस लागतो. मात्र, सध्या खवा बनविण्यासाठी आधुनिक यंत्रे उपलब्ध झाली आहेत. त्यांची किंमत ४० ते ४५ हजार रुपयांपासून सुरू होते.
 • पूर्णपणे फुडग्रेड स्टेनलेस स्टीलपासून बनवलेल्या या यंत्रामध्ये कढई फिरवण्यासाठी एक एचपी क्षमतेची मोटर असून, सिंगल फेजवर चालते. कढाई फिरण्याचा वेग हा ४५ आरपीएम असतो. यंत्राची क्षमता प्रती बॅच १०० ते १२० लीटर दुधावर प्रक्रिया करण्याची असून, त्यातून ३५ ते ४० किलो खव्याची बॅच काढता येते. दूध गरम करण्यासाठी इंधन म्हणून डिझेल किंवा एलपीजी गॅसचा वापर करता येतो.
 • या उपकरणाद्वारे खव्यासोबतच यामध्ये बासुंदी, रबडी बनवता येते. त्याप्रमाणे पनीर, कुल्फी, तूप यांच्या निर्मितीसाठीही करता येतो. टोमॅटो रस, प्यूरी, सॉस, सिरप गरम करण्यासाठीही हे उपकरण वापरता येते. या उपकरणाला ४ फूट बाय ४ फूटची जागा लागते.

लस्सी बनविण्याचे यंत्र 

 • दही उत्तम प्रकारे घुसळण्यासाठी पूर्वी रवीचा वापर केला जात असे. मात्र, मोठ्या प्रमाणात दही घुसळण्यासाठी अलीकडे यंत्रे उपलब्ध झाली आहेत. ही यंत्रे पूर्णपणे फुडग्रेड स्ट्रीलपासून बनवले असून, १०० ते २२० व्होल्ट सिंगल फेजवर चालते. फिरण्याचा वेग १४४० फेरे प्रति मिनिट इतका असून, यंत्राचे वजन हे १० किलो आहे.
 • हे उपकरण पूर्णपणे स्वयंचलित असून, एका मनुष्याच्या साह्याने चालवता येते. यात खालील बाजूला एक कळशीप्रमाणे भांडे जोडलेले असते. त्यात दही, साखर व स्वाद मिसळतो. त्यामध्ये वरील बाजूला स्वयंचलित रवी बसवलेली असते. कमी जागेमध्ये हे यंत्र बसते. किमान ५ लिटर क्षमतेच्या यंत्राची किंमत ७ हजार रुपयांपासून आहे.

प्रमाण-

 • प्रति लिटर दह्यामध्ये २५० ग्रॅम साखर टाकून २ मि.लि. स्वाद मिसळावे. हे मिश्रण १५ ते २० मिनिटे यांत्रिक रवीद्वारे घुसळावे. लस्सी तयार होते. लस्सीला उन्हाळ्यामध्ये खूप मागणी असते.
 • या छोट्या यंत्राद्वारे लस्सी उद्योग घरगुती पातळीवरही करता येऊ शकतो. या यंत्रामध्ये एका बॅचमध्ये ५ लिटर प्रत्येकी १० मिनिटांमध्ये लस्सी मिळते. दिवसभरात ५०० ते ६०० लिटर लस्सी तयार करणे शक्य आहे.

पनीर बनविण्याचे व दाबण्याचे यंत्र -

 • ६ फॅट असलेल्या प्रति लिटर दुधापासून २०० ग्रॅम पनीर तयार होते. पनीरमध्ये केसीन नावाची प्रथिने असून, आरोग्यासाठी फायद्याची असतात. प्रति किलो पनीरला किंमत ही २०० रुपये किलोपासून सुरू होते. यामध्ये साधे पनीर, मलई पनीर, सोया पनीर (टोफू) त्यानंतर सेंद्रिय पनीर असे अनेक प्रकार बाजारामध्ये पाहायला मिळतात.

दूध तापविण्याची पद्धत व यंत्र -

 • पनीर बनविण्यासाठी दूध तापवावे लागते.त्यासाठी सामान्यपणे कढई, पातेले यांचा वापर केला जातो. यासाठी वरील खवा बनवण्याचे यंत्र वापरता येते. त्यात दूध ७२ अंश सेल्सिअस तापमानाला १५ ते २० मिनिटांसाठी गरम करून घ्यावे. त्यानंतर त्याचे तापमान ३५ ते ४० अंशापर्यंत कमी झाल्यानंतर त्यात प्रति लिटर दुधामध्ये २ मिली सायट्रिक आम्ल किंवा व्हिनेगार टाकले जाते.
 • आम्ल टाकत असताना दूध मंद आचेवर ढवळत राहावे लागते. आम्लामुळे दुधापासून चन्ना वरच्या बाजूला व दूधविरहित पाणी (व्हे) खालच्या बाजूला राहते. हे मखमली कपड्यातून गाळून घेत चन्नातील पाणी काढून टाकावे. त्यातील आणखी पाणी काढण्याबरोबरच दाबाखाली आकार देण्यासाठी पनीर प्रेस यंत्र उपलब्ध आहे.

पनीर दाबण्याचे (प्रेस) यंत्र -

 • हा तयार झालेला चन्ना पनीर प्रेस यंत्राखाली ठेवून त्यावर ४० ते ४५ मिनिटांसाठी दाब दिला जातो. त्यामुळे चन्नातील उर्वरित सर्व हे बाहेर निघून जातो. पनीर तयार झाल्यानंतर त्याला दीड तास ५ अंश तापमानाच्या थंड पाण्यामध्ये ठेवावे. त्यामुळे त्यातील आंबटपणा निघून जातो. तयार झालेले पनीर फ्रीजमध्ये ५ अंश सेल्सिअस तापमानाला साठवून ठेवावे.

पनीर प्रेस यंत्र -
मनुष्यचलित पनीर प्रेस यंत्र

 • पनीर प्रेस यंत्रामध्ये २ प्रकारची यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत. पूर्णपणे स्टेनलेस स्टीलपासून बनलेले हे यंत्र ५ किलो क्षमतेचे आहे. या यंत्रामध्ये बॉक्सटाइप पनीर तयार होते. त्याचे वजन ५ ते ७ किलो असून, त्याला जागाही कमी लागते.
 • एका वेळी या यंत्रामध्ये आपण ५ ते १० किलोची बॅच काढतो. एका बॅचसाठी १५ ते २० मिनिटे लागतात. यंत्र बनविण्यासाठी वापरले जाणारे स्टील हे १.६ एम.एम स्टिल जाडीचे शीट असलेल्या मनुष्यचलित यंत्राची किंमत १० हजार रु. पासून सुरू होते.

स्वयंचलित पनीर प्रेस यंत्र

 • मोठमोठ्या दूध प्रक्रिया उद्योगांमध्ये स्वयंचलित पनीर प्रेस यंत्र उपयोगी ठरते. त्याची क्षमता १० किलोपासून १०० किलोपर्यंत असू शकते. १० किलो क्षमतेच्या यंत्राची किंमत २५ ते ३० हजार रु. पर्यंत आहे.
 • हे यंत्र स्टेनलेस स्टील व मिश्र धातूपासून बनवलेले असते. त्यामध्ये एअर कॉम्प्रेसरचा वापर केला जात. ३० ते ४० किलो वजनाच्या या यंत्रासाठी जागाही कमी लागते.

दही बनविण्याचे यंत्र

 • साधारणतः दही बनविण्यासाठी ६ ते ८ तास लागतात. मात्र, व्यावसायिकरीत्या दह्याचे उत्पादन करण्यासाठी ते कमी वेळेमध्ये (१ ते २ तास) बनवण्यासाठी आवश्यक वातावरण तयार करणारी यंत्रे उपलब्ध आहेत.
 • प्रथम दूध ७२ अंश तापमानापर्यंत १० ते १५ मिनिटे गरम करून घ्यावे. त्यानंतर दुधाचे तापमान ३५ ते ४० अंशांपर्यंत कमी झाल्यानंतर त्यात प्रति लिटर दुधासाठी २ ग्रॅम स्टार्टर कल्चर (विरजण) टाकावे. हे दूध दही बनविण्याच्या यंत्रामध्ये ४५ अंश सेल्सिअस तापमानामध्ये २ तासांसाठी ठेवावे.
 • हे दही बनविणारे यंत्र पूर्णपणे स्वयंचलित असून मिश्र धातूचे बनलेले असते. त्यासाठी २२० व्होल्ट ऊर्जा लागत असून सिंगल फेजवर चालते. या यंत्राची क्षमता १०० लीटर प्रतितास इतकी आहे. यंत्रामध्ये ट्रे असून, त्यात २०० मिली, ५०० मिली, १ लिटर आकाराची प्लॅस्टिक जार ठेवता येतात. आतील तापमान मोजण्यासाठी तापमापी असून, त्यानुसार बाह्य पॅनेलवरील बटनांद्वारे तापमान सेट करणे, आतील पंखा लावणे, आतील बल्ब लावणे अशी कामे करता येतात. यंत्राचे वजन हे ३० ते ३५ किलो असून, किंमत २५ हजारांपासून पुढे आहे. या यंत्रामध्ये तयार होणारे दही हे उत्तम दर्जाचे असते. या यंत्रामध्ये सोया दुधापासूनही दही लावता येते.

संपर्क-  सचिन अर्जुन शेळके, ८८८८९९२५२२
(पीएच. डी. विद्यार्थी, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग, सैम हिग्गिनबॉटम कृषी, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय, प्रयागराज, उत्तरप्रदेश.)


इतर टेक्नोवन
सीताफळातील गर, बिया वेगळे करण्यासाठी...सीताफळ हे फळ पिकल्यानंतर फार काळ साठवणे शक्य होत...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...
आवळा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेआपल्या गुणकारी, औषधी गुणधर्मामुळे अनेक आयुर्वेदीय...
वितरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाला गोदाम...सध्या केवळ ड्रोनच्या वापरातून उत्पादने...
अत्याधुनिक लायसीमीटर आधारित सिंचन...पिकाच्या सिंचनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी...
दूध काढण्यासाठी फिरती घडवंची, तिपाईदुग्ध व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन अखिल...
प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतील...हिरव्या वनस्पती किंवा पिकांद्वारे सूर्यप्रकाशाचे...
हायड्रोपोनिक्स पद्धतीने मिळवा चाराहायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित किंवा केवळ...
चाऱ्यासाठी कमी किमतीचे हायड्रोपोनिक्स...अल्प भूधारक पशुपालकांना हिरव्या चाऱ्याची उपलब्धता...
अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर...अक्षय ऊर्जा स्रोतांमध्ये सूर्यप्रकाश, वारा,...
स्वयंचलित ठिबकासह ९० एकरांत यांत्रिकी...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील कृषी पदवीधर व...
सुपारी प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेसुपारी हे कोकणातील व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे...
पिकातील सूक्ष्महवामान मोजणारी उपकरणेया वर्षी महाराष्ट्राच्या अनेक विभागात...
यांत्रिक पद्धतीने भात रोपलागवडीचा...सांगे (जि. पालघर) येथील कृषिभूषण व अभ्यासू शेतकरी...
विरळणी, तण काढणी करा झोपून!अत्यंत आरामदायी स्थितीमध्ये तणनियंत्रणासारखी काम...
अकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे...वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन...
योग्य प्रकारे करा ट्रॅक्टर,अवजारांचा...ट्रॅक्‍टरची सर्व निगा व देखभाल केल्यास सुगीमध्ये...
आले पिकासाठी सुधारित अवजारेवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि...
श्रम कमी करणारी सुधारित अवजारेमहिलांचे शेतीकामातील श्रम लक्षात घेऊन सुधारित...
ट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी...साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती...