agriculture news in Marathi procure Onion fron NAFED Maharashtra | Agrowon

`नाफेड’मार्फत कांदाखरेदी करा 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून शासनास योग्य तो निर्णय घेण्यास अवगत करावे.

नगर : सरकारने ‘नाफेड’मार्फत शेतकऱ्यांचा कांदा १५ ते २० रुपये किलो दराने खरेदी करावा. शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून शासनास योग्य तो निर्णय घेण्यास अवगत करावे, असे साकडे पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी खासदार शरद पवार यांना पत्राद्वारे घातले आहे. 

गायकवाड म्हणाले, की राज्यात यंदा मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली. मागील वर्षाच्या तुलनेत अधिक उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांकडे प्रचंड कांदा पडून आहे. सध्या कोरोनामुळे देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे शेतमालाची विक्री करणे अत्यंत अवघड झाले आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची मागणी जवळजवळ निम्म्याहून जास्त पटीने कमी झाली आहे. त्यामुळे दर महिन्याला गरजेपेक्षा काही लाख टन कांदा विक्रीविना राहत आहे. 

‘‘आगामी काळात मागील विक्रीविना राहिलेला कांदा; शिवाय रब्बी हंगामात उत्पादित होत असलेला कांदा, असा मोठ्या प्रमाणात माल शिल्लक राहणार आहे. परिस्थिती सुधारली, तरी कांद्याला किफायतशीर बाजारभाव मिळणे अत्यंत अवघड आहे. सध्या बाजारात कांद्याचे भाव ६ ते ८ रुपये किलोपर्यंत घसरले आहेत. शासनाच्या आदेशाप्रमाणे अनेक बाजार समित्यांनी कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू करण्याचा प्रयत्न केला; परंतु व्यापाऱ्यांकडून कोरोनाच्या भीतीमुळे, तसेच खरेदी केलेल्या कांद्याला मागणी नसल्याने खरेदी-विक्रीस असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे सरकारनेच ‘नाफेड’मार्फत हा कांदा खरेदी करावा,’’ अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...