औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची ३४ हजार क्‍विंटल खरेदी

औरंगाबाद : राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या माध्यमातून औरंगाबाद व नगर जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या पाच केंद्रांवरून ३४ हजार १९३ क्‍विंटल ५५५ किलो कापसाची हमी दराने खरेदी करण्यात आली.
Procurement of 34,000 quintals of cotton in Aurangabad, Nagar district
Procurement of 34,000 quintals of cotton in Aurangabad, Nagar district

औरंगाबाद : राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या माध्यमातून औरंगाबाद व नगर जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या पाच केंद्रांवरून ३४ हजार १९३ क्‍विंटल ५५५ किलो कापसाची हमी दराने खरेदी करण्यात आली. 

महासंघाच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, बालानगर, तुर्काबाद व नगर जिल्ह्यातील निरजगाव व शेवगाव या पाच ठिकाणी कापसाची हमी दराने खरेदी करण्यासाठी केंद्र सुरू करण्यात आली. सिल्लोड व बालानगरचे केंद्र २७ नोव्हेंबरला, तुर्काबाद शेवगावचे २८ नोव्हेंबरला, तर निरजगावचे केंद्र २९ नोव्हेंबरला सुरू करण्यात आले. या सर्व पाच केंद्रांवरून २ डिसेंबरपर्यंत ३४ हजार १९३ क्‍विंटल ५५ किलो कापसाची हमी दराने खरेदी करण्यात आली. 

खासगी बाजारात ५४०० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलने सुरू असलेली कापूस खरेदी व आधी शेतकऱ्यांना अति पावसामुळे कापूस उत्पादनात ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त बसलेला फटका, याचा परिणाम हमी दराने कापूस खरेदीवर प्रकर्षाने दिसतो आहे. त्यामुळे यंदा दोन महिण्यापेक्षा जास्त काळ कापूस खरेदी सुरू राहील, अशी आशा नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

सततच्या व अति पावसाचा कापसाच्या दर्जावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. त्यामुळेही कापसाच्या खरेदीवर परिणाम झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सिल्लोड येथे एका जिनिंगच्या माध्यमातून ५३४५ क्‍विंटल ७० किलो, बालानगर केंद्रावर तीन जिनिंगच्या माध्यमातून १२९८८ क्‍विंटल ६४ किलो, तुर्काबादच्या केंद्रावरून दोन जिनींगच्या माध्यमातून ९ हजार १४२ क्‍विंटल ५ किलो कापसाची खरेदी करण्यात आली. 

नगरमध्येही खरेदी

नगर जिल्ह्यातील शेवगावच्या केंद्रावर एका जिनिंगच्या माध्यमातून २८१९ क्‍विंटल ८५ किलो, निरजगावच्या केंद्रावर एका जिनिंगच्या माध्यमातून ३८९६ क्‍विंटल ९० किलो कापसाची खरेदी करण्यात आल्याची माहिती कापूस पणन महासंघाच्या वतीने देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com