agriculture news in Marathi, Procurement of gram by eleven centers in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात अकरा केंद्रांद्वारे हरभरा खरेदी सुरू
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 मे 2019

जळगाव ः जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदी ११ केंद्रांमध्ये सुरू असून, या केंद्रांमध्ये आतापर्यंत मिळून नऊ हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे. 

हरभरा खरेदीला पारोळा, अमळनेर, पाचोरा भागात कमी प्रतिसाद मिळत आहे. तर चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर येथील केंद्रात बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. रावेर, यावल, चोपडा येथे प्रतिदिन २५० ते २०० क्विंटल आवक होत आहे. सध्या बाजारात हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा कमीच असून, ते ४००० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. हे दर परवडत नसल्याने ऑनलाइन नोंदणी केलेले शेतकरी शासकीय केंद्रात विक्री करीत आहेत. 

जळगाव ः जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदी ११ केंद्रांमध्ये सुरू असून, या केंद्रांमध्ये आतापर्यंत मिळून नऊ हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे. 

हरभरा खरेदीला पारोळा, अमळनेर, पाचोरा भागात कमी प्रतिसाद मिळत आहे. तर चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर येथील केंद्रात बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. रावेर, यावल, चोपडा येथे प्रतिदिन २५० ते २०० क्विंटल आवक होत आहे. सध्या बाजारात हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा कमीच असून, ते ४००० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. हे दर परवडत नसल्याने ऑनलाइन नोंदणी केलेले शेतकरी शासकीय केंद्रात विक्री करीत आहेत. 

सध्या जिल्ह्यात जळगाव, पारोळा, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव, जामनेर, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड येथे खरेदी केंद्रे सुरू आहेत. यातील यावल केंद्र मागील आठवड्यातच सुरू झाले. तर इतर नऊ केंद्र २४ ते २७ एप्रिलदरम्यान सुरू झाले.
सुरवातीच्या आठवड्यात सुमारे तीन हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली होती. जळगाव येथील केंद्रात फक्त १०० शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसंबंधी नोंदणी केली आहे. यातील कमाल शेतकऱ्यांनी हरभऱ्याची विक्री केली आहे. परंतु सुमारे २५ शेतकऱ्यांनी आपला हरभरा विक्रीसाठी केंद्रात आणलेला नाही, अशी माहिती मिळाली. 

चुकारे अप्राप्त
ज्या शेतकऱ्यांनी २४ ते ३० एप्रिलदरम्यान शासकीय केंद्रात हरभऱ्याची विक्री केली, त्यातील कुठल्याही शेतकऱ्यास चुकारे प्राप्त झालेले नाहीत. चुकाऱ्यांसाठी शेतकरी बॅंक व केंद्रात चकरा मारत आहेत. परंतु तेथे त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची माहिती मिळाली. 

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...