मुदतीपूर्वीच थांबली मका खरेदी

मुदतवाढीला दीड दिवसाचा कालावधी शिल्लक असतानाच राज्यासाठी दिलेला अडीच लाख क्विंटल मका खरेदीचा लक्षांक पूर्ण झाल्यामुळे पोर्टल बंद पडून मका खरेदी थांबली आहे.
maize
maize

औरंगाबाद : मुदतवाढीला दीड दिवसाचा कालावधी शिल्लक असतानाच राज्यासाठी दिलेला अडीच लाख क्विंटल मका खरेदीचा लक्षांक पूर्ण झाल्यामुळे पोर्टल बंद पडून मका खरेदी थांबली आहे. दुसरीकडे शेकडो शेतकऱ्यांचा मका खरेदी करणे अजूनही बाकी आहे. हमीभावाने मका खरेदीचा लक्षांक पूर्ण झाल्याने खरेदी थांबली होती. मात्र हजारो शेतकऱ्यांचा मका शिल्लक असल्याने पुन्हा एकदा ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देऊन २ लाख ५० हजार क्विंटल खरेदीचा लक्षांत देण्यात आला. या लक्षांकाने पुन्हा एकदा उत्पादकांच्या पदरी निराशा आणली आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यात शेकडो शेतकऱ्यांचा मका खरेदी करणे बाकी असतानाच गुरुवारी (ता. ३०) दुपारी मका खरेदीचे पोर्टल लक्षांकपूर्तीमुळे बंद पडले. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री, कन्नड, वैजापूर व जालना जिल्ह्यातील जाफराबाद, भोकरदन आदी केंद्रांवर वाहने घेऊन उभे असलेल्या मका उत्पादकांची निराशा झाली आहे. मुदतवाढ देताना शासन लक्षांक का देते, असा प्रश्न मका उत्पादक उपस्थित करीत आहेत.  लक्षांकासह मुदतवाढ देताना मका खरेदीसाठीचे पोर्टल मात्र जवळपास एक दिवस उशिराने सुरू करण्यात आले. त्याचाही परिणाम प्रत्यक्ष खरेदी सुरू होण्यावर झाला होता. पोर्टल बंद पडले तरी मका घेऊन केंद्रावर आलेल्या मका उत्पादकांची नेमकी किती मका शिल्लक राहिली याची चाचपणी करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनचे कर्मचारी शुक्रवारी (ता ३१) भोकरदन व जाफराबाद येथील केंद्रांवर पंचनाम्यासाठी गेले होते. शेकडो शेतकऱ्यांची मका खरेदी करणे बाकी असल्याने शासन आता या खरेदीला मुदतवाढ देईल का? हा प्रश्न आहे. जालना जिल्ह्यात मका खरेदीसाठी सात केंद्र सुरू करण्यात आली होती. या सात केंद्रावरून ३१ जुलै अखेरपर्यंत ७३ हजार ४४१ क्विंटल ५१ किलो मका १९५४ शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या मक्यापैकी २३१९४ क्विंटल मका शासनाकडे जमा करणे बाकी होते. तर ५० हजार २४० क्विंटल ५५ किलो मका तहसील कार्यालयाकडे जमा करण्यात आली होती.

औरंगाबाद जिल्ह्यात  १ लाख क्विंटल खरेदी औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी ८ केंद्र सुरू करण्यात आली होती. या केंद्रावरून ७८३२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी ५९६६ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीचे एसएमएस पाठविण्यात आले. त्यापैकी ३ हजार ८६९ शेतकऱ्यांकडीलच १ लाख १४ हजार ४३६ क्विंटल मका खरेदी करणे यंत्रणेला शक्य झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com