agriculture news in Marathi produce quality turmeric for export Maharashtra | Agrowon

निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्या

टीम अॅग्रोवन
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात तसेच उत्पादन वाढ झाली आहे. निर्यातीसाठीही मोठी संधी आहे. त्यामुळे मूल्यवर्धन होऊन फायदा होईल. 

हिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात तसेच उत्पादन वाढ झाली आहे. निर्यातीसाठीही मोठी संधी आहे. त्यामुळे मूल्यवर्धन होऊन फायदा होईल. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी दर्जेदार हळद उत्पादन घ्यावे. त्यासाठी विविध विभागांकडून आवश्यक ती मदत करण्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत, असे प्रतिपादन राज्य शासनाच्या हळद संशोधन व प्रक्रिया अभ्यास समितीचे अध्यक्ष तथा हिंगोली चे खासदार हेमंत पाटील यांनी केले.

शनिवारी (ता.२६) सायंकाळी चार वाजता सुर्या फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी लि.सातेफळ (ता.वसमत) तर्फे नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीच्या माध्यमातून वसमत येथून दोनशे टन हळद बांगलादेशला रवाना करण्यात आली. यावेळी श्री. पाटील 
बोलत होते. 

यावेळी झूम मिटींगव्दारे सह्याद्री फार्मर्स प्रोड्युर्स कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, महाएफपीचे योगेश थोरात, अपेडा (हैद्राबाद) चे नागपाल लोहकरे, सुर्या फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद बोरगड, नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार, नाबार्डचे व्यवस्थापक प्रितम जंगम, तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपहाड, संजय पांढरे, आदींसह सहकार, पणन विभागाचे अधिकारी उपस्थित व सहभागी झाले होते.

श्री.बोरगड म्हणाले, की बांगलादेशच्या प्राण कंपनीने सुर्या फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी लि.सातेफळ (ता.वसमत) कडे ३०० टन हळदीची मागणी केली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात वसमत तालुक्यातील २०० टन हळद निर्यात करण्यात आली. 
वसमत येथून ट्रकव्दारे मुंबई येथील जवाहरलाल नेहरु बंदरामध्ये तेथून जहाजाव्दारे बांगलादेशला रवाना करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात १०० टन हळद पाठविण्यात येणार आहे. 

श्री. शिंदे म्हणाले, की हिंगोली जिल्ह्यातील हळद निर्यातीमध्ये सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीची महत्त्वाची भूमिका आहे. यामुळे शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल. उपाध्यक्ष ज्ञानदेव गव्हाणे, संचालक शुभम नादरे, गणेश पान्हेकर, विठ्ठल वाघ, कावेर बोरगड, कळमनुरी येथील गोदा फार्मच्या संचालकांनी पुढाकार घेतला.


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...
पुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...
वाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...
कृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...
लाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...
माथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...
जालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना  : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...
कापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...
रत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...
नांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...
मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...
देवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...
पाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...
उद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...
भोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...
सोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...
पंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
विदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...
‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...
रब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...