Agriculture news in marathi Produced by group farming Will increase: Dr. Patil | Page 2 ||| Agrowon

गटशेतीद्वारे उत्पादनात वाढ होईल ः डॉ. पाटील

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 नोव्हेंबर 2021

रत्नागिरी ः ‘‘शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन, गट तयार करून अथवा सहकार पद्धतीने शेती केली, तर उत्पादन वाढेल. पिकांमधील गुणवत्ता वाढेल आणि फळ पिके निर्यातीमध्येही वाढ होईल. त्यामुळे उत्पादनासाठी येणारा खर्चही कमी होईल’’, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले. 

रत्नागिरी ः ‘‘शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन, गट तयार करून अथवा सहकार पद्धतीने शेती केली, तर उत्पादन वाढेल. पिकांमधील गुणवत्ता वाढेल आणि फळ पिके निर्यातीमध्येही वाढ होईल. त्यामुळे उत्पादनासाठी येणारा खर्चही कमी होईल’’, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले. 

जिल्हाधिकारी कार्यालय येथील अल्पबचत सभागृहात कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान यंत्रणेतर्फे (आत्मा) आयोजित जिल्हास्तरीय आंबा निर्यात कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटे येथील कृषी विद्यावेत्ता डॉ. वैभव शिंदे आदी उपस्थित होते. 

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘पीक घेताना जैविक स्रोत वापरा. आरोग्याच्या दृष्टिने जैविक शेतीवर भर द्या. ’’

‘झाडांची तब्येत जाणून घ्या’ 

‘‘पोषक द्रव्य दिली तरच झाड चांगले उत्पादन देते. त्यासाठी बागेत जाऊन झाडांची तब्येत जाणून घेतली पाहिजे. टिश्यू लॅनालायसीस केले, तर त्या झाडाला काय आवश्यक आहे, ते समजू शकेल. त्यानुसार पुरक द्रव्ये देता येतील. आता तीच वेळ असून बागायतदारांनी त्यावर भर दिला पाहिजे. सध्या फुलकिडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हापूसच्या बागेतील अन्य झाडे जगवली पाहिजेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर बागायतदारांनी भर दिला पाहिजे,’’ असा सल्ला संशोधक डॉ. वैभव शिंदे यांनी दिला.


इतर बातम्या
भात खरेदी दराची वाढ शेतकऱ्यांच्या...राजापूर (जि. रत्नागिरी) ः अनियमित पाऊस, अतिवृष्टी...
जनावरांचे दवाखाने सक्षम करू : स्वामीसोलापूर ः ‘‘जिल्ह्यातील पशुसंवर्धन दवाखान्याच्या...
मराठवाड्यात २२.९८ लाख हेक्‍टरवर रब्बीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदाच्या...
‘चोसाका’कडील थकीत रक्कम त्वरित द्यावीचोपडा, जि. जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर...
बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून...बुलडाणा : राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील...
परभणी जिल्ह्यात आणखी ३८.५१ कोटींची...परभणी : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
ठिबक, तुषार सिंचनाचे अनुदान वाढले ः...नांदेड : ‘‘शासनाने ठिबक तसेच तुषार सिंचनासाठी...
सालेगाव येथे सिंचनाच्या अनुशेषासाठी ॲड...कळमनुरी, जि. हिंगोली ः जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष...
लातूरमध्ये खरेदी केंद्रांवर तूर...लातूर : जिल्ह्यात हमीदराने तूर खरेदीसाठी नोंदणीला...
उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस?सध्या मध्य प्रदेशच्या मध्यभागी हवेचे कमी दाबाचे...
बँकांनी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे लिलाव...जयपूर - राजस्थानमधील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या...
दहावीपर्यंत शिक्षण असून हुकूमचंद तयार...दहावीनंतर शिक्षणाला रामराम ठोकणारे हुकूमचंद...
भारताच्या गहू अनुदान धोरणावर...भारत सरकारकडून देशांतर्गत साखर उद्योगासाठी (Sugar...
‘पोकरा’अंतर्गत ३२७ गावांसाठी १३०...औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (...
जादा दराने खतांची विक्री सात...नाशिक : रब्बी हंगामात शेतकऱ्यांची खतांना मागणी...
महिलांच्या विरोधाने दारू दुकान बंद सिंदी (रेल्वे) (जि. वर्धा) : दारूबंदी असलेल्या...
सोलापुरातील १३ साखर कारखाने ‘लाल यादी’तमाळीनगर, जि. सोलापूर ः यंदाच्या गाळप हंगामात...
जळगावात पावणेदोन लाख हेक्टरपर्यंत रब्बी...जळगाव ः जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ दरम्यान...
उजनीतील बेकायदा प्रवासी बोंटिगवर कारवाई...पुणे : उजनी जलाशयातून करमाळा तालुक्यातील एक...
दोन नगर पंचायतीच्या निवडणुकीत बुलडाणा...बुलडाणा ः जिल्ह्यात दोन नगरपंचायतींचे निकाल लागले...