सातारा जिल्ह्यात २६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

Production of 26 lakh quintals of sugar in Satara district
Production of 26 lakh quintals of sugar in Satara district

सातारा ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरळीत सुरू आहे. या कारखान्यांनी २४ लाख १० हजार ७५६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे २६ लाख ७० हजार ७९५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ११.०८ टक्के साखर उतारा मिळत आहे. थंडीत वाढ झाल्याने साखर उताऱ्यात सुधारणा होऊ लागली आहे.

जिल्ह्यातील ऊस हंगाम वेग आला असून सात सहकारी व सात खासगी कारखान्यांचे गाळप सुरू आहे. २४ लाख १० हजार ७५६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे २६ लाख ७० हजार ७९५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. कृष्णा कारखान्याने गाळपात आघाडी घेतली असून, या कारखान्याने तीन लाख ६२ हजार ६८० मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, चार लाख ३३ हजार १७० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. 

जिल्ह्यात खासगी कारखान्यांची संख्या वाढली असल्याने या कारखान्यांकडून गाळपही वाढले आहे. जिल्ह्यातील सात सहकारी साखर कारखान्यांकडून १२ लाख ९७ हजार ५४७ मेट्रीक टन गाळप केले आहे. त्यातून १४ लाख ७५ हजार १६० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. तर सात खासगी कारखान्यांकडून ११ लाख १३ हजार २०९ टन ऊस गाळपाद्वारे ११ लाख ९५ हजार ६३५ क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. 

सहकारी कारखान्यांचा सरासरी ११.३७ टक्के तर खासगी कारखान्यांकडून १०.७४ टक्के सरासरी उतारा मिळत आहे. खासगी कारखान्यांच्या तुलनेत सहकारी कारखान्यांचा उताऱ्यांची टक्केवारी अधिक आहे. थंडीत वाढ झाल्यामुळे साखर उताऱ्यात सुधारणा होऊ लागल्याने साखरेचे उत्पादनात वाढ होण्यास मदत होत आहे. मजूरटंचाईवर मात करण्यासाठी हंगामाच्या सुरुवातीपासून ऊसतोडणीसाठी हार्वेस्टरचा वापर केला जात आहे.

एकरकमी एफआरपी नाहीच उसाची बिले एकरकमी मिळण्याची मागणी हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकरी संघटनांनी करून साखर कारखान्यांनी दुर्लक्ष केले आहे. जिल्ह्यातील अथणी-रयत या कारखान्यांचा अपवाद वगळता इतर कोणत्याही कारखान्यांनी एक रकमी एफआरपी दिलेली नाही. काही कारखान्यांची एफआरपीचे तुकडे करून पहिला हप्ता दिला आहे. तर काही कारखान्यांकडून अजूनही पहिला हप्ता दिला नसल्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे. गाळप हंगाम सुरू होण्यास उशीर झाल्यामुळे ऊस वेळेत तुटावा म्हणून विरोध केला जात नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com