Agriculture news in Marathi Production of 26 lakh quintals of sugar in Satara district | Agrowon

सातारा जिल्ह्यात २६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 जानेवारी 2020

सातारा ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरळीत सुरू आहे. या कारखान्यांनी २४ लाख १० हजार ७५६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे २६ लाख ७० हजार ७९५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ११.०८ टक्के साखर उतारा मिळत आहे. थंडीत वाढ झाल्याने साखर उताऱ्यात सुधारणा होऊ लागली आहे.

सातारा ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरळीत सुरू आहे. या कारखान्यांनी २४ लाख १० हजार ७५६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे २६ लाख ७० हजार ७९५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ११.०८ टक्के साखर उतारा मिळत आहे. थंडीत वाढ झाल्याने साखर उताऱ्यात सुधारणा होऊ लागली आहे.

जिल्ह्यातील ऊस हंगाम वेग आला असून सात सहकारी व सात खासगी कारखान्यांचे गाळप सुरू आहे. २४ लाख १० हजार ७५६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे २६ लाख ७० हजार ७९५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. कृष्णा कारखान्याने गाळपात आघाडी घेतली असून, या कारखान्याने तीन लाख ६२ हजार ६८० मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, चार लाख ३३ हजार १७० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. 

जिल्ह्यात खासगी कारखान्यांची संख्या वाढली असल्याने या कारखान्यांकडून गाळपही वाढले आहे. जिल्ह्यातील सात सहकारी साखर कारखान्यांकडून १२ लाख ९७ हजार ५४७ मेट्रीक टन गाळप केले आहे. त्यातून १४ लाख ७५ हजार १६० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. तर सात खासगी कारखान्यांकडून ११ लाख १३ हजार २०९ टन ऊस गाळपाद्वारे ११ लाख ९५ हजार ६३५ क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. 

सहकारी कारखान्यांचा सरासरी ११.३७ टक्के तर खासगी कारखान्यांकडून १०.७४ टक्के सरासरी उतारा मिळत आहे. खासगी कारखान्यांच्या तुलनेत सहकारी कारखान्यांचा उताऱ्यांची टक्केवारी अधिक आहे. थंडीत वाढ झाल्यामुळे साखर उताऱ्यात सुधारणा होऊ लागल्याने साखरेचे उत्पादनात वाढ होण्यास मदत होत आहे. मजूरटंचाईवर मात करण्यासाठी हंगामाच्या सुरुवातीपासून ऊसतोडणीसाठी हार्वेस्टरचा वापर केला जात आहे.

एकरकमी एफआरपी नाहीच
उसाची बिले एकरकमी मिळण्याची मागणी हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकरी संघटनांनी करून साखर कारखान्यांनी दुर्लक्ष केले आहे. जिल्ह्यातील अथणी-रयत या कारखान्यांचा अपवाद वगळता इतर कोणत्याही कारखान्यांनी एक रकमी एफआरपी दिलेली नाही. काही कारखान्यांची एफआरपीचे तुकडे करून पहिला हप्ता दिला आहे. तर काही कारखान्यांकडून अजूनही पहिला हप्ता दिला नसल्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे. गाळप हंगाम सुरू होण्यास उशीर झाल्यामुळे ऊस वेळेत तुटावा म्हणून विरोध केला जात नाही.


इतर बातम्या
कमी फॅटचे दुध पिल्यास म्हतारपण कमी होतं...कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
नाशिकमध्ये 'शिवभोजन’ थाळी सुरूनाशिक  : ''शिवभोजन योजना'' ही राज्यातील...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
कोल्हापूरला ३९१ कोटी रुपयांवर कर्जमाफी...कोल्हापूर : ‘‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि...
विदर्भ, कोकणात आज हलक्या पावसाचा अंदाज पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांअभावी राज्यात थंडी...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत ५७...नाशिक : राज्यातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
दूध उत्पादक महत्त्वाचा दुवा: हरिभाऊ...औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या एकूणच...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
अर्जेंटिनाला होणार आंबा निर्यात पुणे : कोकणातील हापूस आणि मराठवाड्यातील केशर...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...