कौलव येथे ‘लॉकडाउन’ काळात कृषी कोळप्याची निर्मिती

ऊस लागणीनंतर शेतात तण काढणी आणि बाळ भरणीच्या कामासाठी जादा मजूर व वेळ अधिक लागतो. यावर तोडगा म्हणून आधुनिक ऊस कोळपा हे शेती अवजार फारच उपयुक्त ठरणारे आहे. जलद गतीने तण काढणी होत असल्याने तणनाशक वापरावे लागणार नाही. - कृष्णात चरापले, शेतकरी, कौलव.
 Production of agricultural cobblestones during the lockdown at Kaulav
Production of agricultural cobblestones during the lockdown at Kaulav

राशिवडे, जि. कोल्हापूर : लॉकडाउनच्या कालावधीत शेतकरी शेतात पहाटेच्या वेळी शेतीकामे करतात. त्यानंतर दिवसभर घरी स्वतःला बंदिस्त करून ठेवतात. कौलव (ता.राधानगरी) येथील प्रगतिशील शेतकरी कृष्णात भाऊ चरापले यांनी लॉकडाउन काळात लागणीच्या उसाला उपयुक्त असे कृषी अवजार तयार केले आहे. अतिशय अल्प किमतीत अवजार निर्मिती करून शेतकऱ्यांना ऊस आणि भात शेतीला फायदेशीर आशा आधुनिक कृषी कोळप्याची निर्मिती केली आहे. 

चरापले हे भोगावती हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आहेत. त्यांनी अनेक कृषी उपकरणे तयार केली आहेत. शेतकऱ्यांना विविध उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. त्यांनी आता लागणीच्या ऊस पिकासाठी वैशिष्ट्यपूर्ण कोळपे तयार केले आहे. या कोळप्याच्या साहाय्याने लागणीच्या उसाला बाळ भरणी, तण काढणी सुलभपणे करता येते. त्याच बरोबर उसाला दोन्ही बाजूंनी मातीची भरणी करता येते. त्यामुळे तण काढणीसाठी लागणारी मजुरी, वेळ आणि खर्चात बचत होते. 

नेहमीच्या कोळप्या प्रमाणेच हा कोळपा आहे. त्याच्या पत्त्यामध्ये बदल केला आहे. तिरकस पाते जोडून त्याच्या शेजारी पट्टी जोडली आहे. वजनाने हलके अवजार असल्याने दोन व्यक्ती सहजपणे शेतीमध्ये तण काढणी, उसाला मातीची भर देण्याची कामे करू शकतात. या अवजाराला फक्त दोनशे रुपये खर्च आला आहे. हे कोळपे ऊस शेतीबरोबर भात आणि अन्य पिकांच्या शेतीमध्ये उपयुक्त ठरणारे आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com