परभणी : सोयाबीनची उत्पादकता हेक्टरी १० क्विंटल ४६ किलोवर
परभणी : सोयाबीनची उत्पादकता हेक्टरी १० क्विंटल ४६ किलोवर

परभणी : सोयाबीनची उत्पादकता हेक्टरी १० क्विंटल ४६ किलोवर

परभणी : सन २०१९-२० च्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्याची सोयाबीनची उत्पादकता १० क्विंटल ४६ किलो (एकरी ४ क्विंटल १८ किलो) आली आहे.

२०१८-१९ च्या तुलनेत २०१९-२० या वर्षी जिल्ह्यातील सोयाबीनच्या सरासरी प्रतिहेक्टरी उत्पादकतेत २१ किलोने घट आली आहे. परंतु, त्याआधीच्या पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा यंदाची उत्पादकता ३ क्विंटल ७ किलोने जास्त आली आहे. पालम तालुक्यात सोयाबीनची उत्पादकता सर्वांत कमी प्रतिहेक्टरी २ क्विंटल ४४ किलो एवढी आली आहे. संयुक्त पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरून हे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात सन २०१९-२० च्या खरीप हंगामात २ लाख ४० हजार ५७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. सोयाबीनची उत्पादकता काढण्यासाठी कृषी, महसूल, ग्रामविकास विभागातर्फे जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांमध्ये ४५६ पीक कापणी प्रयोग घेण्यात आले. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये पीक कापणी प्रयोगाच्या संख्येत वाढ झाली. या प्रयोगांचे विश्लेषण करण्यात आल्यानंतर जिल्ह्याची सोयाबीनची प्रतिहेक्टरी उत्पादकता सरासरी १० क्विंटल ४६ किलो आली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

परभणी तालुक्यातील सोयाबीनची उत्पादकता सर्वाधिक म्हणजे प्रतिहेक्टरी सरासरी १३ क्विंटल ७ किलो (एकरी ५ क्विंटल २२ किलो) आली आहे, तर पालम तालुक्यात सर्वात कमी २ क्विंटल ४४ किलो (एकरी ९७ किलो) आली आहे.  गतवर्षी २०१८-२९ जिल्ह्याची सोयाबीनची उत्पादकता प्रतिहेक्टरी सरासरी १० क्विंटल ८७ किलो (एकरी ४ क्विंटल ३४ किलो) आली होती. वर्षे २०१३-१४ ते २०१७-१८ या पाच वर्षाची सोयाबीनची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ७ क्विंटल ३९ किलो (एकरी २ क्विंटल ९४ किलो) आली होती. यंदा गतवर्षीपेक्षा प्रतिहेक्टरी २१.३३ किलोने घट झाली आहे. परंतु गेल्या पाच वर्षातील सरासरीपेक्षा उत्पादकतेपेक्षा ३ क्विंटल ७ किलोने जास्त आली आहे.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काढणीस आलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पावसामुळे शेंगा गळून पडल्यामुळे उत्पादनातही मोठी, परंतु पावसापूर्वीच पीक कापणी प्रयोगास सुरुवात झाली होती. त्यामुळे पीक कापणी प्रयोगाची सरासरी उत्पादकता जास्त आल्याचे दिसत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com