Agriculture news in marathi Production costs rose, rates fell | Page 3 ||| Agrowon

सांगली : उत्पादन खर्च वाढला, भाजीपाल्याचे दर घसरले

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 ऑगस्ट 2021

आठवडा बाजार सुरू झाले आहेत, पण व्यवहार सुरळीत नाहीत. बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्यामुळे विक्री व्यवस्थेची घडी बसली नसल्याने भाजीपाल्याच्या दरात घरसण होत असल्याचे चित्र आहे.

सांगली : आठवडा बाजार सुरू झाले आहेत, पण व्यवहार सुरळीत नाहीत. बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्यामुळे विक्री व्यवस्थेची घडी बसली नसल्याने भाजीपाल्याच्या दरात घरसण होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे.

 जिल्ह्यातील वाळवा, पलूस, मिरज, कडेगाव तालुक्यात प्रामुख्याने भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्याचबरोबर अलीकडच्या काळात दुष्काळी पट्ट्यात शाश्वत पाण्याची सोय झाल्याने तेथील शेतकरीही भाजीपाल्याकडे वळाले आहेत.

सांगली जिल्ह्यातून पुणे, मुंबई, कोकण, दिल्ली यासह अन्य बाजारात भाजीपाल्याची विक्री होते. गेल्या काही दिवसांपासून बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली आहे. परंतु मागणी नसल्याने भाजीपाल्याचा उठाव होत नाही. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने आठवडा बाजार सुरू करण्यास परवागी दिली आहे. त्यामुळे आठवडा बाजार सुरू झाले आहेत. परंतु आठवडा बाजार सुरू झाले असले तरीअजूनही बाजार पूर्ववत झाले नाहीत.

परिणामी शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीस अडचणी येत आहेत. तसेच बाजार समितीतून किरकोळ व्यापारी, खरेदीदार भाजीपाल्याची खरेदी करून त्यांची विक्री करतात. मात्र, ग्राहकांकडून मागणी कमी असल्याने व्यापारी, खरेदीदारांकडून भाजीपाल्याची खरेदी कमी झाली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाहतूक, मजूर, खतांच्या वाढत्या दरामुळे उत्पादन खर्चात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ढोबळी मिरचीस प्रती किलोस सहा रुपये, असा दर आहे. शेतऱ्यांनी घातलेला खर्चही मिळणे मुश्कील झाले आहे.

प्रतिक्रिया
मार्केटमध्ये सांगली जिल्ह्यासह परराज्यांतून भाजीपाल्याची आवक वाढली आहे. आवक वाढली असली तरी उठाव नाही. सर्व भाज्यांना ५ ते १० रुपये, किलो असे दर आहेत.
- दिलावर बागवान, भाजीपाला व्यापारी

प्रतिक्रिया

पहिल्यांदा ढोबळी मिरची लावली. सुरुवातीला १५ ते २० रुपये, असा दर मिळाला. पण आता दर कमी झाला आहे. त्यामुळे मिरची काढून टाकणार आहे. त्याच शेतात कारल्याचे पीक घेणार आहे. 
- तात्यासो नागावे, खटाव, ता. पलूस


इतर ताज्या घडामोडी
अकोला, वाशीम जि.प.,पंचायत समिती...अकोला ः जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त...
आठवडी बाजार सुरू करा : मुनगंटीवारचंद्रपूर ः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव...
शिवसेनेचे शिष्टमंडळ लखीमपूरला जाणार;...नवी दिल्ली : लखीमपूर खेरी येथील हिंसा आणि...
सांगलीत १० ते १५ टक्क्यांनी सोयाबीनचे...सांगली ः जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी...लखनौ ः लखीमपूरमधील हिंसाचारानंतर राज्य...
लखीमपूर खेरीतील हिंसाचार...नवी दिल्ली ः शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या लखीमपूर...
पुणे जिल्ह्यातील पशुधन बाजार बंदपुणे ः केंद्र सरकारकडून वेळेत लसींचा पुरवठा न...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
मागणी वाढल्याने उन्हाळ  कांदा...नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत...
आजच्या ग्रामसभांना ग्रामसेवकांचा विरोध नगर : राज्याच्या ग्रामविकास विभागाने आज (ता. २)...
राज्य सरकारने तातडीने भरपाईचा निर्णय...नागपूर : राज्यावर मोठी नैसर्गिक आपत्ती येते....
वीजदर सवलतीबाबत उपमुख्यमंत्री सकारात्मक कोल्हापूर : राज्यातील उच्च दाब आणि लघू दाब सहकारी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे...नाशिक : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
बँकांनी कर्ज प्रकरणे वेळेत मंजूर करावीत...वाशीम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांनी खरीप आणि...
शेतकरी आंदोलकांवर सर्वोच्च न्यायालय...नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमांवर ठाण...
‘माळेगाव कारखाना देणार  शेतकऱ्यांना ‘...माळेगाव, जि. पुणे : माळेगाव साखर कारखाना आगामी...
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...