बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे : शिंदे

बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे : शिंदे
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे : शिंदे

परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करून येत्या हंगामातील बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील कपाशीच्या पिकाला पाणी देऊन फरदडचे उत्पादन घेऊ नये. कापूस वेचणीनंतर कपाशीचे उभे पीक रोटाव्हेटर किंवा अन्य औजारांद्वारे काढून टाकावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले.

तरोडा (ता. जि. परभणी) येथील शेतकरी सूर्यभान कदम यांच्या कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर आढळून आला आहे. बोंडे फोडून पाहिली असता त्यामध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त बोंडांमध्ये गुलाबी बोंड अळी आढळून आली. कदम यांनी याबाबत कृषी विभागास माहिती दिली. त्यानंतर बुधवारी (ता. १४) शिंदे, तालुका कृषी अधिकारी पी. बी. बनसावडे, मंडळ अधिकारी एम. जी. गायकवाड, कृषी सहायक उद्धवराव शेळके, रवी कुरंगळ, क्राॅपसॅपचे पर्यवेक्षक सय्यद रहीम यांनी कदम यांच्या शेतावर भेट देऊन बोंड अळीगस्त कपाशीच्या पिकांची पाहणी केली. या वेळी मोठ्या प्रमाणावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले. बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीवर फिरवला रोटाव्हेटर..

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कदम यांच्या शेतातील बोंड अळीग्रस्त कपाशीचे पीक शिंदे यांनी स्वतः रोटाव्हेटर चालवून काढून टाकण्याची सुरवात केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com