सांगली जिल्ह्यात साखरेचे दहा लाख क्विंटल उत्पादन

Production of one million quintals of sugar in Sangli district
Production of one million quintals of sugar in Sangli district

सांगली : जिल्ह्यात यंदा सहकारी व खासगी १२ साखर कारखान्यांनी पंधरवड्यात ९ लाख ७६ हजार २८५ टन उसाचे गाळप केले. तर, १० लाख १३ हजार ७४६ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. माणगंगा, महांकाली, तासगाव, जत, यशवंत-खानापूर, केन ॲग्रो या कारखान्यांचा हंगाम अजूनही बंदच आहे. जिल्ह्यात महापूर आणि अतिवृष्टीमुळे यंदा कारखान्यांचा गळीत हंगाम उशिराने २२ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे.

नोव्हेंबरअखेरीस काही, तर काही कारखाने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाले. हंगाम फेब्रुवारीअखेरपर्यंत कसाबसा चालेल, अशीच परिस्थिती आहे. कारखाने सुरू होऊन दोन ते आठवडे उलटले, तरी अद्याप कारखान्यांनी दराची कोंडी फोडली नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कारखानदार काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले  आहे. 

स्वाभिमानी संघटनेने एफआरपी अधिक दोनशे रुपये दराची मागणी केली आहे. रघुनाथदादा पाटील यांच्या संघटनेने गुजरात व उत्तर प्रदेशातील कारखान्यांप्रमाणे दराची मागणी केली आहे. पहिली उचल ४५०० रुपये द्यावी, अशी त्यांच्या संघटनेची मागणी आहे. तर, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपीची मागणी केली आहे. 

दराची कोंडी फुटली नसली, तरी कमी कालावधीत जादा गाळप करण्यासाठी कारखान्यांची स्पर्धा रंगली आहे. पंधरा दिवसांत १२ साखर कारखान्यांनी एकूण ९ लाख ७६ हजार २८५ टन उसाचे गाळप करून १० लाख १३ हजार ७४६ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सरासरी उतारा १०.३८ इतका आहे. सोनहिरा, क्रांती, दत्त इंडिया, राजारामबापू कारखाना साखराळे या कारखान्यांनी एक लाखाहून अधिक टन उसाचे गाळप केले.

उदगिरी शुगर या खासगी कारखान्याला सर्वाधिक उतारा ११.५३ इतका मिळाला आहे. त्या खालोखाल राजारामबापू साखराळे युनिटचा उतारा ११.४५ इतका आहे. 

गाळप, साखर उत्पादन स्थिती

कारखाना ऊस गाळप (मेट्रिक टन) साखर (क्विंटल) उतारा
वसंतदादा (दत्त इंडिया) १०२२८०   ८७३७० ८.५४ 
राजारामबापू साखराळे  १००५४५   ११५१००   ११.४५ 
विश्‍वास सहकारी  ८०७६०  ७८१५० ९.६८
हुतात्मा किसन अहिर   ५८७२५  ६०६५० १०.३३ 
राजारामबापू वाटेगाव  ६८१९०   ७२६००  १०.६५
सोनहिरा सहकारी १३९५०५ १४८११०  १०.६२ 
क्रांती कुंडल १२२१८७.३ १३०५२०  १०.६८ 
सर्वोदय-राजारामबापू   ४२५००    ४५७००    १०.७५
मोहनराव शिंदे   ३५३४०    ३१९५० ९.०४ 
निनाईदेवी-दालमिया ५२६९५  ५९९५०  ११.३८
उदगिरी शुगर   ९८९२०  ११४०४०   ११.५३ 
सद्‌गुरू श्री श्री   ७४६३८  ६९६०६ ९.३३ 
एकूण ९७६२८५.३ १०१३७४६ १०.३८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com