Agriculture news in marathi; Production of one quintal of fly seed in Khandesh | Page 2 ||| Agrowon

खानदेशात उडदाचे एकरी एक क्विंटलपर्यंत उत्पादन
टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

जळगाव ः खानदेशातील शेतकऱ्यांसाठी उडदाचे पीक यंदा आतबट्ट्याचे व तोट्याचे ठरले आहे. दरही हमीभावाएवढे नसल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. 

अतिपावसाने काळ्या कसदार जमिनीत पीक पुरते वाया गेले. उशिरा पेरणी केलेल्या हलक्‍या क्षेत्रातील पीक हाती आले, परंतु त्याचा दर्जाही अतिपावसात घसरला. अडीच ते तीन क्विंटल एकरी उत्पादनाची अपेक्षा होती. परंतु, उत्पादन एकरी एक क्विंटल जेमतेम आले आहे.

जळगाव ः खानदेशातील शेतकऱ्यांसाठी उडदाचे पीक यंदा आतबट्ट्याचे व तोट्याचे ठरले आहे. दरही हमीभावाएवढे नसल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. 

अतिपावसाने काळ्या कसदार जमिनीत पीक पुरते वाया गेले. उशिरा पेरणी केलेल्या हलक्‍या क्षेत्रातील पीक हाती आले, परंतु त्याचा दर्जाही अतिपावसात घसरला. अडीच ते तीन क्विंटल एकरी उत्पादनाची अपेक्षा होती. परंतु, उत्पादन एकरी एक क्विंटल जेमतेम आले आहे.

खानदेशात सुमारे ५० हजार हेक्‍टरवर उडदाची पेरणी झाली होती. केळी व इतर पिकांसंबंधी बेवड आणि जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढीसंबंधी अनेक शेतकरी या पिकाची पेरणी करतात. तापी, गिरणा, वाघूर, पांझरा, गोमाई नदीकाठी पेरणी बऱ्यापैकी असते. जळगाव जिल्ह्यात सुमारे २५ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली होती. कमाल शेतकरी पेरणीसाठी घरी जतन केलेले वाण वापरतात.

यंदा अतिपावसाने फवारण्यांची गरज नव्हती. एकदा तणनियंत्रण व दोनदा आंतरमशागत करून पीक जोमात वाढले. रासायनिक खतात अनेकांनी फक्त डीएपी किंवा फक्त सुपर फॉस्फेटची एक बॅग एकरी दिली होती. उडदाला ५७०० रुपये हमीभाव जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना दरही बऱ्यापैकी मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु सप्टेंबरमध्ये जळगाव, धुळ्यात अनेक भागांत २८ दिवस सतत पाऊस सुरू होता. त्यामुळे पिकाला फटका बसला. दाणे बारीक पडले. त्यांचा रंग फिकट तपकिरी झाला. बुरशी वाढली. दर्जा घसरल्याने बाजारात दर कमी झाले. सध्या फक्त ३००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत.

पीक कापणीसाठी एकरी दीड हजार किमान खर्च आला. मळणीसाठी प्रतिक्विंटल २५० रुपये लागले. वाहतूक, शेतकऱ्याचा मेहनताना व इतर बाबी लक्षात घेतल्यास उडदाचे पीक तोट्याचे ठरले आहे. जेथे काळी कसदार शेती आहे, ते शेतकरी उडदानंतर आता कोरडवाहू ज्वारी, हरभरा पेरणीची तयारी करीत आहेत. पेरणीसंबंधी पूर्वमशागतीचा खर्च करायचा आहे. 
 

उडदाचे पीक अतिपावसाने नुकसानकारक ठरले. ओला उडीद मळणीसाठी क्विंटलमागे ५०० रुपये खर्च आला. पिकात अतिपावसाने तूटही आली होती. दर ३००० रुपये आहे. अशात आर्थिक तोटा वाढला आहे. 
- प्रवीण पाटील, उडीद उत्पादक, खेडी खुर्द (जि. जळगाव)
 

इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्ह्यात आले पिकावर ‘करपा’चा...सातारा  ः अतिपावसाचा फटका इतर पिकांप्रमाणे...
पावसामुळे स्ट्रॉबेरीचा हंगाम लांबणीवरपुणे : मॉन्सूनचा लांबलेला मुक्काम आणि...
केंद्राच्या निधीविना रखडली आंतरजातीय...पुणे  : समाजामध्ये समतेची भावना रुजावी,...
नगर जिल्हा परिषदेला रस्ते  दुरुस्तीसाठी...नगर  ः नुकत्याच झालेल्या पावसाने जिल्ह्यातील...
मेटगुताड परिसरात रानगव्यांकडून...भिलार, जि. सातारा  : लांबलेल्या पावसाने...
हमाली दरवाढीवरून कोल्हापुरात गूळ सौदे...कोल्हापूर : खरेदीदार व माथाडी कामगारांच्या हमाली...
सांगली जिल्ह्यात ऊसदर आंदोलनाची पहिली...सांगली  : जिल्ह्यात ऊसदरासाठी आंदोलनाची...
सात-बारा कोरा करणार असाल तरच पाठिंबा :...पुणे ः राज्यात सत्ता स्थापनेसाठी सुरू...
पीकविमा कंपन्या या सरकारपुरस्कृत माफिया...पुणे ः पीकविमा कंपन्या या सरकारपुरस्कृत...
पुण्यामध्ये जागतिक देशी गोवंश परिषदपुणे ः विविध राज्यांतील पशुपालक देशी गोवंश...
पुण्यात हिरवी मिरची, गाजराच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
रब्बी हंगामासाठी ‘काटेपूर्णा’चे पाणी...अकोला ः यंदा तुडुंब भरलेल्या काटेपूर्णा...
शेतीमाल वाहतूकदारांची वाहने अडवीत पोलिस...अमरावती ः मॉन्सूनोत्तर पावसाच्या नुकसानीमुळे आधीच...
रब्बी हंगामासाठी कुळीथ, हरभरा बियाणे...रत्नागिरी ः अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे...
कर्जमाफीच्या याद्या करण्यासाठी...कोल्हापूर : पूरग्रस्त पंचनाम्यांची माहिती तातडीने...
आपत्तीचा सामना सकारात्मकतेने करा ः...नाशिक : ‘‘मुश्किलो से भाग जाना आसाँ होता है, हर...
पंचनाम्याच्या तुलनेत तीस टक्क्यांपेक्षा...रत्नागिरी ः अतिवृष्टीत रत्नागिरी जिल्ह्यातील भात...
सातारा : पावणेदोन लाख शेतकऱ्यांना...सातारा  : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे...
गडचिरोली : दुर्गंधीमुळे पोल्ट्री बंदचा...गडचिरोली ः मोठ्या प्रमाणात वातावरणात पसरणाऱ्या...
लष्करी अळीच्या भीतीने मका लागवडी...जळगाव ः खानदेशात हरभऱ्यानंतर महत्त्वाचे मानल्या...