agriculture news in marathi, Production of pre-existing Cotton half | Agrowon

पूर्वहंगामी कपाशीचे उत्पादन निम्म्यावर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

जळगाव : पावसाचा लहरीपणा आणि नंतरचा शेंदरी बोंडअळीचा डंख यामुळे खानदेशातील कापूस उत्पादन यंदा निम्म्यावर येणार असल्याचे निश्‍चित मानले जात आहे. आजघडीला खानदेशातील पूर्वहंगामी कपाशीचे जवळपास ३० हजार हेक्‍टर क्षेत्र रिकामे झाले आहे. पूर्वहंगामी कापूस उत्पादकांना एकरी साडेचार ते पाच क्विंटलच उत्पादन मिळाले असून, कोरडवाहू कपाशीतून उत्पादन खर्चही हाती येणार नाही, अशी स्थिती आहे.

जळगाव : पावसाचा लहरीपणा आणि नंतरचा शेंदरी बोंडअळीचा डंख यामुळे खानदेशातील कापूस उत्पादन यंदा निम्म्यावर येणार असल्याचे निश्‍चित मानले जात आहे. आजघडीला खानदेशातील पूर्वहंगामी कपाशीचे जवळपास ३० हजार हेक्‍टर क्षेत्र रिकामे झाले आहे. पूर्वहंगामी कापूस उत्पादकांना एकरी साडेचार ते पाच क्विंटलच उत्पादन मिळाले असून, कोरडवाहू कपाशीतून उत्पादन खर्चही हाती येणार नाही, अशी स्थिती आहे.

जळगाव आणि धुळ्यात पूर्वहंगामी किंवा बागायती (मे, जून महिन्यातील लागवड) कपाशीची लागवड जवळपास एक लाख २३ हजार हेक्‍टरवर झाली आहे. चोपडा, यावल, रावेर, जळगाव, मुक्ताईनगर, शिंदखेडा, शिरपूर, शहादा, नंदुरबार या तापीकाठावरील तालुक्‍यांमध्ये मे, जून महिन्यांत कपाशीची सूक्ष्मसिंचनावर मोठ्या प्रमाणात लागवड झाली, तर कोरडवाहू कपाशीची लागवडही अधिक झाली.

मात्र जूनमध्ये पावसाने दगा दिला. नंतर दुबार लागवड करावी लागली. त्यानंतर पावसाने ओढ दिली आणि तिबार लागवड करण्याची वेळ आली. आणखी जुलै, ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने कोरडवाहू कपाशी तर पुरती वाया गेली. त्याच वेळी पूर्वहंगामी कपाशीवर जुलै महिन्यात शेंदरी बोंडअळी आली.

पूर्वहंगामी कपाशीचे दिवाळीपर्यंतचे वेचे बरे आले. नंतर एका झाडावर दोन, चार बोंडे रुईदार आणि इतर किडलेले, कवड्यांचे निघत आहेत. मजूर वेचणीला नकार देत आहेत. अशातच फरदडचे उत्पादन येणार नाही म्हणून ती काढून फेकली जात आहे. चोपडा, जळगाव, शिरपूर, यावल, शहादा, नंदुरबार भागात क्षेत्र रिकामे केले जात असून, त्यावर मका व इतर रब्बी पिकांची लागवड झाली आहे.

दरम्यान खानदेशात कापूस उत्पादन अधिक येईल, असा आशावाद जिनर्स, व्यापाऱ्यांना होता. पण अगदी दिवाळीपूर्वीच हा अंदाज चूक असल्याचे जाणवले. त्यामुळेच की काय, निम्म्याच जिनिंग सुरू झाल्या. जिनर्सचा २२ लाख गाठींच्या उत्पादनाचे नियोजनही कोलमडले आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...