agriculture news in marathi Production of quality animal feed on inferior fodder in Sagaroli | Agrowon

सगरोळीत निकृष्ट चाऱ्यावर दर्जेदार पशुखाद्य निर्मिती

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

नांदेड : मराठवाड्यात बहुतांश शेतकरी तूर, मूग, उडीद, सोयाबीन इत्यादी पिके घेतात. खळे झाल्यानंतर काड शिल्लक राहते. 

नांदेड : ‘‘मराठवाड्यात बहुतांश शेतकरी तूर, मूग, उडीद, सोयाबीन इत्यादी पिके घेतात. खळे झाल्यानंतर काड शिल्लक राहते. हा भुसा शेतकरी शेतामध्येच कुजवतात, जाळून टाकतात. परंतु यावर प्रक्रिया करून दर्जेदार पशुखाद्य बनवू शकतो. ह्याचे प्रात्यक्षिक सगरोळी (ता. बिलोली) येथे कृषी तंत्रज्ञान सप्ताहात शेतकऱ्यांना करून दाखवण्यात आले. 

पीक काढणीनंतर शिल्लक राहिलेला भुसा निकृष्ट दर्जाचा असल्याने जनावरांना फारसा आवडत नाही. परंतु अशा निकृष्ट चाऱ्यावर युरिया आणि गूळ वापरून चारा प्रक्रिया केल्यास त्या निकृष्ट चाऱ्याचे रूपांतर पौष्टिक चाऱ्यात होते. गूळ, मीठ, युरिया आणि खनिज मिश्रण यांचे द्रावण चाऱ्यावर शिंपडून २१ दिवस बंद पिशवीत ठेवल्यास दर्जेदार चारा बनतो. दुसऱ्या प्रकारात हिरव्या चाऱ्याची कुट्टी करून पाणी, गूळ, मीठ व खनिज मिश्रणाचे द्रावण शिंपडून हवाबंद पिशवीमध्ये ४५ ते ६० दिवस ठेवल्यानंतर मूरघास तयार होते. ही प्रक्रिया करून वर्षभर जनावरांना पौष्टिक खाद्य देऊ शकतो. 

मुरघास निर्मिती दरम्यान हवा विरहित स्तिथीमध्ये अंबावण्याची प्रक्रिया होते. यामध्ये प्रथिने, कॅरोटीन आणि इतर आम्ल तयार होतात. यामुळे याला आंबट गोड वास असतो. एका बंद पिशवीतील खाद्य एका जनावरासाठी  जवळपास दोन महिने पुरेल. ह्या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचा चाऱ्यावरील खर्च कमी होऊन जनावरांना दर्जेदार खाद्य मिळते. यावेळी शेतकऱ्यांनी स्वतः सर्व वस्तू हाताळून पाहिल्या व स्वतःच्या शेतातील भुसा, काढ, वापरण्याचे निश्चित केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.  कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ डॉ. निहाल मुल्ला, पशुधन पर्यवेक्षक भास्कर बुच्छलवार, राजू गिरगावकर यांनी या प्रक्रियेची माहिती दिली.


इतर ताज्या घडामोडी
शहरातील आठवडे बाजारांवर महापालिका...पुणे ः शेतकऱ्यांच्या शेतमालाला मध्यस्थाशिवाय थेट...
अखाद्य वस्तूंमुळे जनावरांना होणारे अपाय जनावरांना होणारे सर्वसामान्य संसर्गजन्य आजार हे...
परभणी जिल्ह्यात कृषी, पशुसंवर्धनासाठी...परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या...
काबुली हरभऱ्याचा दर आठ हजार रुपयांवरजळगाव  ः  खानदेशात काबुली हरभऱ्याची आवक...
‘रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप...सातारा :  ‘‘या वर्षी चांगला पाऊस पडला....
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ...अकोला : इतर मागासप्रवर्गासाठी (ओबीसी) असलेल्या २७...
‘भरड धान्य खरेदी केंद्रांसाठी तातडीने...जळगाव  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात फक्त मका...
तापमानात वाढ होण्यास सुरुवातमार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रावरील...
तेलकट डाग रोग व्यवस्थापनाच्या सहा...तेलकट डाग रोग (बॅक्टेरियल ब्लाइट किंवा बीबीडी)...
‘जलयुक्त’च्या कामाची धारवाडी, चिचोंडीत...नगर : जलयुक्त शिवार अभियानातील तक्रारी असलेल्या...
अकोला जिल्हा परिषदेत ओबीसी सदस्यांवर...अकोला : इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) असलेल्या...
उत्तर सोलापुरात २३ गावांचे होणार...सोलापूर : ‘‘गावठाणातील जमिनींचे ड्रोनद्वारे...
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना...औरंगाबाद : ‘‘असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म अन्न...
खानदेशात जलसाठा मुबलक जळगाव : खानदेशात विविध प्रमुख सिंचन...
हरभरा दर सुधारल्याने नांदेडचे शेतकरी...नांदेड : ‘‘केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार...
परभणी जिल्ह्यात तुती लागवडीसाठी ५८५...परभणी ः ‘‘महारेशीम अभियानांतर्गत रेशीम शेती...
साताऱ्यात ४३१ कुटुंबांच्या घराचे स्वप्न...कऱ्हाड : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी १००...
सामूहिक गट शेतीतील ऊस तोडणीस सुरुवात नाशिक : सटाणा तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीस...
परभणी जिल्ह्यातील हरभऱ्याचा पीकविमा...परभणी ः लिमला (ता. पूर्णा) तसेच परिसरात यंदा...
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी शासनाची...मुंबई : राज्यातील धुळे, नंदुरबार, नागपूर, अकोला,...