Agriculture news in marathi Production at zero due to the cultivation of fake flower plants | Agrowon

फ्लॉवर रोपांना कंदच आले नाही; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

नाशिक : ‘‘नाशिक शहराजवळील विविध गावांमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. त्यात पळसे हे गावदेखील आघाडीवर आहे. भाजीपाला रोपवाटिकेतून तयार झालेली लागवडीयोग्य रोपे खरेदी करतात. एका रोपवाटिकेतून फ्लॉवरची रोपे खरेदी करून अर्धा एकर लागवड केली. मात्र, ३ महिने लागवडीनंतर कंद तयार न झाल्याने लागवडीसाठी केलेला ५० हजारांचा खर्च वाया गेल्याची,’’ माहिती विलास गायधनी यांनी दिली. 

नाशिक : ‘‘नाशिक शहराजवळील विविध गावांमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. त्यात पळसे हे गावदेखील आघाडीवर आहे. भाजीपाला रोपवाटिकेतून तयार झालेली लागवडीयोग्य रोपे खरेदी करतात. एका रोपवाटिकेतून फ्लॉवरची रोपे खरेदी करून अर्धा एकर लागवड केली. मात्र, ३ महिने लागवडीनंतर कंद तयार न झाल्याने लागवडीसाठी केलेला ५० हजारांचा खर्च वाया गेल्याची,’’ माहिती विलास गायधनी यांनी दिली. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी रुंजा गायधनी यांनी गावातील रोपवाटिकेतून अर्धा एकर क्षेत्रावर लागवड करण्यासाठी सात हजार रोपांची प्रतिरोप ७० पैसे दराने रोपांची खरेदी केली. त्याची लागवड ३ ऑक्टोबरला करण्यात आली होती. लागवडीनंतर वेळोवेळी खत पुरवठा, औषध फवारणी करण्यात आली. रोपांची डेरेदार वाढ झाली. मात्र, तीन महिने कालावधी उलटून गेल्यानंतरही बनावट रोपांमुळे कंदाची निर्मिती न झाल्याने उत्पादन आलेच नाही. त्यामुळे लागवडीपासून त्यांनी केलेला खर्च वाया गेला आहे.

गायधनी यांच्याकडे भांडवल नसल्यामुळे हात उसनवारी व काही निविष्ठा उधारीवर खरेदी केल्या होत्या. पिकासाठी दुसऱ्याकडून पाणी घेतले. मात्र, आता उत्पादन न आल्याने ते अडचणीत सापडले. त्यांनी कंद तयार न झाल्याबाबत खरेदी केलेल्या रोपवाटिकेच्या संचालकांना माहिती दिली. त्यावर संबंधित बियाणे कंपनीचे पाहणी करतील, असे सांगण्यात आले. मात्र, चार दिवस उलटून कुणीही पाहणी केली नाही. तसेच दखल घेतलेली नाही. त्यामुळे नुकसान भरपाई व मजुरी खर्च मिळावा, ही मागणी श्री. गायधनी यांनी केली आहे.
 

फ्लॉवरला कंद येण्याची तीन महिने वाट बघितली पण आमची फसवणूक झाली आहे. ५० हजार रुपये लागवड खर्च आला आहे. अजून, खतांचे पैसे आणि पाणीपुरवठा आम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांकडून घेतले होते. तेही पैसे देणे बाकी आहे, तरी कंपनीवर कारवाई करावी, आम्हांला संपूर्ण भरपाई मिळावी. अन्यथा आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही.’’
- विकास गायधनी, शेतकरी, पळसे, नाशिक 


इतर ताज्या घडामोडी
पुणे विद्यापीठात पश्चिम विभागीय औषधी...पुणे  ः केंद्र सरकारच्या आयुष...
शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळ्यासाठीची...शिर्डी, जि. नगर  : साई सिद्धी चॅरिटेबल...
माळेगाव कारखान्यात सत्तापरिवर्तन;...माळेगाव, जि. पुणे  ः राज्यात लक्षवेधी...
नगर जिल्ह्यातील सहा केंद्रांवर तूर...नगर  ः जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी आठ...
कर्जमाफीवरून विरोधक दुसऱ्या दिवशीही...मुंबई  ः भाजपने शेतकरी कर्जमाफी आणि महिला...
सातारा जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्रावर...सातारा  ः जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे रब्बी...
मसाला, सुगंधी वनस्पतीवर्गीय पिकांची...अकोला  ः ‘‘आपल्याकडील हवामान, जमीन हे मसाला...
मराठवाड्यात यंदा तुती लागवडीसाठी...औरंगाबाद : मराठवाड्यात गतवर्षी दुष्काळाचा...
संपूर्ण कर्जमुक्तीसाठी भाजपचे आंदोलन अकोला  : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने...
`म्हैसाळ`च्या उन्हाळी आवर्तनाकडे...सलगरे, जि. सांगली : म्हैसाळ पाणी योजनेचे कालवे...
अकोला झेडपी देणार आत्महत्याग्रस्त...अकोला  ः नापिकी, कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात...
लातूर विभागात १४ लाख हेक्‍टरवर रब्बी...लातूर : विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत...
अमरावती जिल्ह्यात निवडणुकांचा बिगुलअमरावती  ः जिल्ह्यात एप्रिल ते जून या...
वऱ्हाडातील चार लाख शेतकरी...अकोला  ः राज्य शासनाने जाहीर केलेल्या...
मराठवाडा, खानदेशातील नऊ कारखान्यांची...औरंगाबाद  : येथील साखर सहसंचालक...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ३३११...नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जळगाव : कर्जमाफीसाठी ११३ शेतकऱ्यांचे...जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कराडी येथे रेंजअभावी कर्जमाफी लाभार्थी...पारोळा, जि. जळगाव ः राज्य सरकारच्या महात्मा...
पुष्पोत्सव अधिक मोठ्या स्वरूपात साजरा...नाशिक : ‘नाशिक महापालिका राबवत असलेला...
नाशिक जिल्ह्यात गव्हाच्या पेऱ्यात वाढनाशिक : जिल्ह्यात रब्बीच्या एकूण १ लाख १३ हजार...