हमीभावाने हरभरा खरेदीत उत्पादकता मर्यादेचा खोडा

हमी दराने शेतमाल खरेदीत शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागते. तुरी पाठोपाठ आता हरभऱ्याची हमी दराने खरेदी सुरू झाली.
हमीभावाने हरभरा खरेदीत उत्पादकता मर्यादेचा खोडा
हमीभावाने हरभरा खरेदीत उत्पादकता मर्यादेचा खोडा

औरंगाबाद : हमी दराने शेतमाल खरेदीत शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागते. तुरी पाठोपाठ आता हरभऱ्याची हमी दराने खरेदी सुरू झाली. परंतु, हमी दराने खरेदीसाठी हरभऱ्याचे जे हेक्‍टरी उत्पादन ठरविण्यात आले ते शेतकऱ्यांना हरभरा विक्रीत अडचणीचे ठरण्याची शक्यताच जास्त आहे. राज्य शासनाने नुकतीच हमी दराने तूर खरेदीसाठी नोंदणीकरिता तीस दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यासोबतच राज्यभरातील विविध केंद्रांवरून हमी दराने हरभऱ्याची खरेदीही सुरू केली आहे. या हरभऱ्याच्या खरेदीसाठी राज्यातील ३३ जिल्ह्यांसाठी शासनाने हरभऱ्याची हेक्टरी उत्पादकता ही ठरवून दिली आहे. नेमकी ही उत्पादकता मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता जास्त आहे.  शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात हरभऱ्याचे एकरी उत्पादन कमीत कमी चार ते पाच क्विंटल तर जास्तीत जास्त आठ ते दहा क्विंटल होते. असे असताना शासनाने हमी दराने हरभरा खरेदीसाठी हरभऱ्याची जी हेक्टरी उत्पादकता निश्चित केली आहे ती प्रत्यक्ष उत्पादकतेच्या तुलनेत प्रचंड कमी असल्याची स्थिती आहे.  हमीभावाने खरेदीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात हमी दराने हरभरा खरेदी साठी हेक्टरी साडेपाच क्विंटल, जालना जिल्ह्यात ६ क्विंटल ८७ किलो, बीड जिल्ह्यात सहा क्विंटल, लातूर जिल्ह्यात सहा क्विंटल ५० किलो, उस्मानाबाद जिल्ह्यात सहा क्विंटल २५ किलो, नांदेड जिल्ह्यात नऊ क्विंटल, परभणी जिल्ह्यात सात क्विंटल ५० किलो, तर हिंगोली जिल्ह्यात हेक्टरी १३ क्विंटलपर्यंत उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय एक शेतकरी एका दिवसाला २५ क्विंटलपर्यंतच हरभरा खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणू शकणार आहे.  उत्पादकता मर्यादा वाढविण्याची मागणी एकीकडे उत्पादकता जास्त असताना हमी दराने खरेदीसाठीची उत्पादकता कमी असणे, त्यातही एका शेतकऱ्याला एका दिवसाला केवळ २५ क्विंटल हरभरा विक्रीची मर्यादा असणे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन तत्काळ कमी दराने हरभरा खरेदी साठीची हरभऱ्याची उत्पादकता वाढवून देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com