Agriculture news in marathi productivity loss in Tour purchases in Aurangabad district | Page 2 ||| Agrowon

औरंगाबाद जिल्ह्यात तूर खरेदीत निश्‍चित उत्पादकतेचा खोडा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

तुरीचे पीक बऱ्यापैकी आले आहे. अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांची लागवड शेतकरी करीत आहेत. तरीही हेक्‍टरी केवळ ५ क्‍विंटल ४५ किलो तुरीचे उत्पादन निश्‍चित केल्याने कोंडी झाली आहे. 
- ईश्‍वर सपकाळ, शेतकरी, तिडका (ता. सोयगाव जि. औरंगाबाद)

सलग तुरीत एकरी ८ ते १२ क्‍विंटलपर्यंत तुरीचे उत्पादन होते. मग हेक्‍टरी ५ क्‍विंटल ४५ किलो उत्पादन खरेदीसाठी निश्‍चित करणे योग्य नाही. शासनाने व संबंधित यंत्रणेने याचा फेरविचार करून शेतकऱ्यांची अडचण दूर करावी. 
- बळिराम होटकर, शेतकरी, विहामांडवा, ता. पैठण.

औरंगाबाद  : हमीभावाने तूर खरेदीत ऑनलाइन पीकपेऱ्याची अडचण आहे. तो मिळण्याची संथगती कायम आहे. यातच आता तूर खरेदीसाठी जिल्ह्यात हेक्‍टरी ५ क्‍विंटल ४५ किलो या प्रमाणात पेरा आवश्‍यक केला आहे. त्यानुसार तूर खरेदी निश्‍चित करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

जिल्ह्यात आंतरपीक म्हणून तुरीचे पीक घेतले जाते. फार मोजके शेतकरी तुरीची सलग पेरणी वा लागवड करतात. साधारणत: कपाशीतच तुरीचे आंतरपीक घेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. सलग पीक नसल्याने तुरीचा पिकपेरा शेतात पिक असूनही मिळण्यात अडचण येते. जिल्ह्यात खरेदीसाठी मार्केटिंग फेडरेशनचे ६, विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे २ व शेतकरी उत्पादक  कंपन्यांचे ६ खरेदी केंद्रे निश्‍चित केली आहेत. या केंद्रांवरून तूर खरेदीसाठी नोंदणीची प्रक्रिया व १ फेब्रुवारीपासून काही ठिकाणी खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

यंदा ऑक्‍टोबरमधील अतिवृष्टीने खरिपाची सर्वच पिके हातची गेली. केवळ तुरीच्या पिकाकडूनच शेतकऱ्यांना आशा होती. बऱ्यापैकी तुरीचे पीकही आल्याचे चित्र आहे. तुरीचा हमी दर ५ हजार ८०० रुपये  प्रतिक्‍विंटल आहे. बाजारात मात्र त्यापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी होत आहे. त्यावरून तुरीचे उत्पादन बऱ्यापैकी असल्याचे स्पष्ट होते. शिवाय  कपाशीच्या आंतरपिकात हेक्‍टरी ८ ते १२ क्‍विंटलपर्यंत तुरीचे उत्पादन होत आहे. तरीही शासनाने तूर खरेदीसाठी निश्‍चित केलेली हेक्‍टरी उत्पादकता नोंदणी शेतकऱ्यांना अडचणीची ठरणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे खरेदीसाठी तुरीच्या निश्‍चित उत्पादकतेविषयी फेरविचार करण्याची गरज आहे.

मार्केटिंग फेडरेशनतंर्गत  गंगापूर, खुलताबाद व औरंगाबाद या केंद्रावर तूर खरेदीसाठी प्रतिसाद मिळत आहे. गंगापूरच्या केंद्रावर ३७७, खुलताबाद येथे २१ तर, औरंगाबाद येथील केंद्रावर ९३  शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. वैजापूर व कन्नड येथे नोंदणी झाली नाही. विदर्भ मार्केटिंग फेडरेशनतंर्गत पैठणच्या केंद्रावर ७४५ तर, लासूर स्टेशन येथील केंद्रावर २२६, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सहा केंद्रावर ५४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली.


इतर ताज्या घडामोडी
जल प्रदुषण रोखण्यासाठी पूर्णा...अकोला ः पूर्णा नदीला दूषित करणाऱ्यांवर...
मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊसलातूर, जालना, परभणी ः उस्मानाबाद, जालना, बीड...
`पीक कर्जासाठी व्याज घेणाऱ्या बँकांवर...बुलडाणा : शासनाने महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती...
परभणीत राष्ट्रीयकृत, खासगी बॅंकाचे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरिपात मंगळवार (ता.१५)...
कांदेबाग केळी लागवडीची तयारी पूर्ण,...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
खानदेशात रब्बीसाठी सव्वालाख टन खतांची...जळगाव  ः जिल्ह्यात रासायनिक खतांचा खरिपातील...
गरज संरक्षित जल सिंचनाचीसंरक्षित सिंचन व्यवस्था हा एक चांगला पर्याय...
सांगलीत मूग, उडीद खरेदीची ऑनलाईन नोंदणी...सांगली ः खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान...
रत्नागिरीतील चारच मंडळात काजू पिकाचा...रत्नागिरी : हवामानाच्या बदलांमुळे होणाऱ्या...
केळी वाहतुकीसाठी ५० टक्के सवलत द्यावीरावेर, जि. जळगाव : ‘व्हीपीयू’ प्रकारच्या...
अकोला जिल्ह्यात पावसाने उडदाचे ८४००...अकोला ः जिल्ह्यात या हंगामात मुगाच्या पिकापाठोपाठ...
रब्बी हंगामातील लागवडीचे नियोजनरब्बी हंगामात कोरडवाहू परिस्थितीमध्ये नैसर्गिक...
फळबाग सल्ला (कोकण विभाग) आंबा  वाढीची अवस्था  पावसाची...
नाशिकमध्ये वांगी २००० ते ५००० रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कृषी सचिव डवले यांनी घेतला `महाबीज`चा...अकोला ः आगामी रब्बी हंगामासाठी `महाबीज`कडे...
जळगाव जिल्ह्यात उडदाला नीचांकी दरजळगाव : एकीकडे उडदाचे मोठे नुकसान अतिपावसात...
`उजनी`तून `भीमा`त ३० हजार क्‍युसेकने...सोलापूर : उजनी धरणामध्ये वरच्या धरणातून येणाऱ्या...
जस्तगावातील सोयाबीनचा विमा मंजूर करातेल्हारा, जि. अकोला :  तालुक्यातील जस्तगाव...
लातूरमध्ये पाऊस,‘तेरणा’ला पूरऔरंगाबाद : औरंगाबाद, बीड व लातूर जिल्ह्यातील सहा...
पुणे विभागात पेरणीत सव्वा तीन लाख...पुणे : चालू वर्षी वेळेवर झालेल्या पावसामुळे...