Agriculture news in marathi Productivity of soybean in Nanded district is thirteen quintals 62 kg per hectare | Page 2 ||| Agrowon

नांदेड जिल्ह्यातील सोयाबीनची उत्पादकता हेक्टरी तेरा क्विंटल ६२ किलो

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 मे 2021

नांदेड : मागील खरीप हंगाम २०२०-२१ मधील जिल्ह्यातील सोयाबीनची सरासरी उत्पादकता १३ क्विंटल ६२ किलो आली आहे.

नांदेड : मागील खरीप हंगाम २०२०-२१ मधील जिल्ह्यातील सोयाबीनची सरासरी उत्पादकता १३ क्विंटल ६२ किलो आली आहे. जिल्ह्यात पीक कापणी प्रयोगाच्या ९५२ संकलनावरून उत्पादकता जाहीर करण्यात आली. यात सर्वाधिक उत्पन्न उमरी तालुक्यात २२ क्विंटल ९६ किलो तर सर्वात कमी भोकर तालुक्याचे पाच क्विंटल ७९ किलो आल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.

जिल्ह्यात पिकाचे सरासरी उत्पादकता जाहीर करण्यासाठी संबंधित पिकाच्या पीक कापणी प्रयोगातून स्पष्ट होते. यंदा जिल्ह्यातील सोळा तालुक्यात सोयाबीनच्या ९६० पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले होते. यातील प्राप्त झालेल्या ९५२ संकलनातून तालुकानिहाय सोयाबीनचे उत्पादन निश्चित करण्यात आली आहे.

कृषी विभाग, महसूल तसेच जिल्हा परिषद या तीन यंत्रणांच्या माध्यमातून पीक कापणी प्रयोग हाती घेण्यात येतो. दहा बाय पाच मीटर आकाराचा प्लॉट निश्चित करून त्यातून उत्पादकता काढली जाते. एकूण प्रयोगाच्या सरासरी उत्पादकतेवर तालुक्याची उत्पादकता निश्चित करून तालुक्याच्या सरासरी उत्पादकता निश्‍चित केली जाते. तर तालुक्याच्या उत्पादकतेवर जिल्ह्याची सरासरी उत्पादकता कृषी विभागाच्या सांख्यिकी विभागाकडून निश्चित केली जाते.

पीक कापणी प्रयोगातून प्राप्त झालेल्या ९५२ संकलन नोंदीवरून जिल्ह्याची सरासरी सोयाबीनची उत्पादकता १३ क्विंटल ६२ किलो आली आहे. यात सर्वाधिक उमरी तालुक्याची २२ क्विंटल ९६ किलो तर सर्वात कमी पाच क्विंटल ७९ क्विंटल भोकर तालुक्याची आली आहे.

तालुकानिहाय उत्पादकता (हेक्टरमध्ये)

नांदेड १२ क्विंटल १० किलो, अर्धापूर १३ क्विंटल ८३ किलो, मुदखेड १४ क्विंटल २८ किलो, कंधार १४ क्विंटल ३५ किलो, लोहा १३ क्विंटल १५ किलो, बिलोली ११ क्विंटल २४ किलो, देगलूर १५ क्विंटल ४८ किलो, धर्माबाद १६ क्विंटल ८१ किलो, नायगाव ९ क्विंटल ६२ किलो, मुखेड ११ क्विंटल ७५ किलो, माहूर १५ क्विंटल ५१ किलो, हिमायतनगर १५ क्विंटल ९४ किलो, किनवट १६ क्विंटल १२ किलो, हदगाव १३ क्विंटल ९७ किलो, भोकर ५ क्विंटल ७९ किलो, उमरी २२ क्विंटल ९६ किलो.


इतर बातम्या
अकोल्यातील २३३६ कर्जदार सावकारी...अकोला : शासनाने जाहीर केलेल्या परवानाधारक सावकारी...
गोंदिया : पावसाअभावी दीड लाख हेक्‍...गोंदिया :  देशात मॉन्सूनचे आगमन होऊन दोन...
नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्यावी...सोलापूर : ‘‘यंदा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण...
उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनमध्ये शंखी...बेलकुंड, जि. उस्मानाबाद जिल्ह्यात : बेलकुंड (ता....
नांदेडमध्ये नुकसानीचे पंचनामे करण्याचे...नांदेड : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच सततच्या...
खानदेशात सोयाबीन पेरणीत घटजळगाव : खानदेशात यंदा नापेर क्षेत्र यंदा वाढणार...
खानदेशात कापसाची आठ लाख हेक्टरवर लागवडजळगाव ः  खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. यंदा...
भीमा-नीरा नदी काठांवरील गावांनी सतर्क...सोलापूर : ‘‘भीमा-नीरा खोऱ्यात होत असलेल्या...
मराठवाड्यात पाऊस कायम; जोर कमीऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. २३)...
नाशिक जिल्ह्यात खासगी पशुसेवकांचे काम...येवला : खासगी पशुसेवक ग्रामीण भागात मोठ्या...
पावसाची उघडीप; पूरस्थिती कायम पुणे : कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह...
सांगलीत चौदा हजार जनावरांचे स्थलांतरसांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर पट्यातील...
कोसळलेला प्रसंग मोठा; तुमचं पुनर्वसन...मुंबई ः तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे....
मुगावर ‘लिफ क्रिंकल’ प्रादुर्भावअकोला : गेल्या हंगामात लिफ क्रिंकल विषाणूजन्य...
परभणी जिल्ह्यात मोठ्या, मध्यम...परभणी ः पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला....
पावसाचा जोर पंधरा दिवस कमी राहण्याची...पुणे : मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह,...
नऊ जिल्हे अतिवृष्टिबाधित मुंबई ः कोकण आणि पश्‍चिम महाराष्‍ट्रातील ९ जिल्हे...
वाशीम जिल्ह्यात ६९९ कोटींचे पीककर्ज वाटपवाशीम : जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
कोल्हापुरात पुराची भीती कायम कोल्हापूर : पावसाने शनिवारी (ता.२४) दुपारपर्यंत...
नीरा देवघर धरणक्षेत्रात सर्वाधिक २५५...पुणे : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम पट्यात...