Agriculture news in marathi Productivity as well as sales skills required: d. L. Tambhale | Agrowon

उत्पादकतेबरोबर विक्री कौशल्यही आवश्‍यक : डी. एल. तांभाळे

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

सोलापूर : "उत्पादकतेबाबत शेतकरी बऱ्यापैकी सजग आहेत. पण, विक्री आणि मार्केटिंगमध्ये ते कमी पडतात. त्यासाठी शेतकऱ्यांनी विक्री कौशल्य आत्मसात करण्याची आवश्‍यकता आहे,'''' असे राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाचे संचालक डी. एल. तांभाळे यांनी बुधवारी (ता. २२) सांगितले. 

सोलापूर : "उत्पादकतेबाबत शेतकरी बऱ्यापैकी सजग आहेत. पण, विक्री आणि मार्केटिंगमध्ये ते कमी पडतात. त्यासाठी शेतकऱ्यांनी विक्री कौशल्य आत्मसात करण्याची आवश्‍यकता आहे,'''' असे राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाचे संचालक डी. एल. तांभाळे यांनी बुधवारी (ता. २२) सांगितले. 

येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचा समारोप तांभाळे यांच्या उपस्थितीत झाला. अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे होते. जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक बी. टी. यशवंते, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. सुजॉय सहा, राष्ट्रीय रब्बी ज्वारी संशोधन केंद्रचे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. एम. वाय. संम्दुर, स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे उपव्यवस्थापक व्ही. बी. पाटील, कृषिभूषण दत्तात्रय काळे, सासुरे येथील कृषी उद्योजिका वैशाली आवारे उपस्थित होत्या.

तांभाळे म्हणाले, "शेतकरी विविध प्रयोग करतात. शेतमालाच्या उत्पादनामध्ये नावीन्यपूर्णता असते. पण, त्याच्या विक्रीची व्यवस्था नसल्याने अडचणी आहेत. पण, नव्याने येत असलेल्या स्मार्ट प्रकल्पातून त्यासाठी शेतकऱ्यांच्या उत्पादनाची मूल्यसाखळी उभी करता येईल. तसे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आत्मातंर्गत स्थापन केलेले शेतकरी गट, बचतगट, शेतकरी उत्पादक कंपन्या आदीद्वारे संघटित असणाऱ्या शेतकऱ्यांना विक्रीसंबधी विशेष प्रशिक्षण देऊन शेतीतील कच्चा माल योग्य ठिकाणी विक्रीस नेण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी पैसेही मंजूर केले आहेत. हा प्रकल्प येत्या दीड ते दोन महिन्यामध्ये कार्यान्वित होईल.''''

डॉ. सहा, काळे, पाटील, आवारे यांनीही आपले विचार व्यक्त केले. डॉ. तांबडे यांनी प्रास्ताविक केले. व्ही. बी. भिसे यांनी सूत्रसंचालन केले. अनिता सराटे यांनी आभार मानले.


इतर बातम्या
आटपाडी तालुक्यात बंद साखर कारखान्यांचा...खरसुंडी, जि. सांगली : टेंभू योजनेच्या खात्रीशीर...
एक लाख टन मका म्यानमारमधून आयातनवी दिल्ली: देशात यंदा कमी उत्पादन झाल्याने...
सेवा हमी कायदा नागरिकांपर्यंत पोचवून...नाशिक  : सेवा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार...
चांदवड येथे साडी नेसून आंदोलननाशिक : चांदवड खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून...
ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावीमुंबई  ः ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी ही...
राज्यातील बावीस कारखान्यांचा गाळप हंगाम...कोल्हापूर  : राज्यातील ऊस गाळप हंगाम हळूहळू...
नांदेड जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची...नांदेड : यंदा उन्हाळी हंगामात जिल्ह्यात गुरुवार (...
केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा :...हिंगोली : ‘‘केंद्र शासन पुरस्कृत योजनांचा लाभ...
पुणे जिल्ह्यात एक लाख ४० हजार...पुणे ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती...
कांदा व्यापारातील सरकारी हस्तक्षेप...नगर  : ‘‘केंद्रीय अन्न व नागरी...
नगर जिल्ह्यात जनावरांचा उपचार चार...नगर ः नगर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय रुग्णालयात आता...
अकोला कृषी विदयापीठाने नियम डावलून...नागपूर : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
रेशन दुकानातून अंडी, चिकन देण्याला...पुणे ः मांसाहारातूनच विषाणूजन्य रोगांचा फैलाव होत...
अफार्मतर्फे ‘ग्रामीण विकासात स्वयंसेवी...पुणे  : अॅक्शन फॉर अॅग्रीकल्चर रिन्युअल इन...
सोलापूर जिल्हा दूध संघाची ‘नोटीस रद्द...सोलापूर  : जिल्हा सहकारी दूध उत्पादक व...
कृषी उद्योजकांच्या अनुभवांनी भारावले...बोंडले, जि. सोलापूर : उद्योजक होताना आलेल्या...
नगर : पैसेवारी कमी लावून प्रशासनाने...नगर ः यंदाही रब्बी हंगामात पीक परिस्थिती फारशी...
स्मार्ट ग्राम योजनेस आर. आर. पाटील...मुंबई   : ग्रामविकास विभागामार्फत...
रिक्त पदांमुळे सातारा ‘एकात्मिक...भिलार, जि. सातारा : एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार वाऱ्यामुळे...सिंधुदुर्ग : गेले दोन-तीन दिवस जिल्ह्यात...