agriculture news in Marathi, productivity will reduce by ३० percent in Varhad, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

वऱ्हाडात कापूस उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट शक्य 

टीम अॅग्रोवन
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

उशिरा येणाऱ्या वाणाला पाऊस फायदेशीर ठरला. ज्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड केली आणि जेथे कमी कालावधीचे वाण होते, अशा ठिकाणचे क्षेत्र सततच्या पावसात सापडले. सतत ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाची कमतरता यांमुळे पातेगळ झाली. उमलेल्या बोंडांना पाणी लागल्याने ती काळवंडली. जोरदार पावसामुळे गुलाबी बोंड अळीचे संकट दूरच राहिले. सुरवातीच्या टप्प्यात लागवड झालेल्या क्षेत्रात पावसामुळे काही नुकसान दिसून आले आहे. परंतु, आता उशिरा येणाऱ्या कपाशीच्या शेतांमध्ये पाण्याचा निचरा झाला असेल तर ही कपाशी बहरू शकते. हे क्षेत्र आपल्याकडे अधिक आहे.  
- डॉ. विनोद खडसे, विस्तार कृषी विद्यावेत्ता, डॉ. पंदेकृवि, अकोला  

अकोला ः या हंगामात लागवड केलेल्या कापसाचे उत्पादन २५ ते ३० टक्के घटण्याची शक्यता आहे. कापसाची लागवड केल्यानंतर सुरवातीच्या टप्प्यात राहिलेले उष्ण तापमान आणि नंतर आता सलग पावसाचा फटका बसला. प्री-मॉन्सून क्षेत्रात कापसाची वेचणी सुरू झाली असून, या कापसाचा दर्जासुद्धा सुमार येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

या हंगामात वऱ्हाडात सुमारे सव्वादोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड झाली. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या शेवटी तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात प्री-मॉन्सून कापसाची लागवड केली. या शेतांमधून आता कापसाच्या वेचणीला सुरवात झाली. अनेक ठिकाणी ‘सीतादही’चे कार्यक्रम होत आहेत. वेचून घरी आणलेल्या कापसात मोठ्या प्रमाणात कवडीचे प्रमाण निघत आहे. गेल्या महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे सुरवातीच्या टप्प्‍यात लागलेल्या बोंड्या काळवंडल्या होत्या. त्यातून निघणारा कापूस काळसर आहे. शिवाय कापसात मोठ्या प्रमाणात कवडी तयार झाली आहे. 

अशा दर्जा खालावलेल्या कापसाला व्यापारी दरही ‘कवडीमोल’ देत आहेत. या कापसाची १८०० ते २००० रुपये क्विंटल दराने मागणी केली जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत. अत्यंत कमी दराने कापूस मागितला जात असल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे. गेल्या हंगामात कापूस सुरवातीपासून चांगला दर मिळवत होता. सरासरी ५००० रुपयांवर विक्री झाली. 

मुळात मॉन्सूनपूर्व कपाशीच्या पहिल्या दोन-तीन वेचणींत येणारा कापूस हा अत्यंत चांगला समजला जातो. या कापसाला दरही चांगले मिळतात. बीटी कपाशीला पहिल्या टप्प्यात फूल, पात्या, बोंडांची संख्या अधिक प्रमाणात लागलेली असते. हाच माल गळाला किंवा नुकसान झाले तर एकूण उत्पादनाला झळ पोचते. या वर्षी हीच स्थिती निर्माण झालेली आहे. सप्टेंबरमध्ये सतत पाऊस झाल्याने पातेगळ, बोंड्या काळवंडणे, असे प्रकार झाले. हे नुकसान २५ ते ३० टक्क्यांवर झालेले आहे. आता निघणारा कापूसही कवडीयुक्त येत आहे. या हंगामात उशिराने लागवड झालेल्या कपाशीपासून उत्पादनाची अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत. 

या कारणांमुळे उत्पादन घटले

  • पातेगळ अधिक झाली, सततच्या पावसाने परिपक्व झालेल्या बोंड्या काळवंडल्या
  • उष्ण तापमान आणि सलग पावसाचा फटका 
  • सततच्या पावसाने कमी कालावधीच्या वाणाचे अधिक नुकसान
  • पुनर्बहर येण्याचे प्रमाण कमी
  • कवडीयुक्त, काळसर कापूस निघत असल्याने शेतकरी चिंतेत
  • एकरी तीन ते चार क्विंटल उत्पादन घटण्याची चिन्हे

खर्च ताळेबंद
नांगरटी -
१०००
कल्टीव्हेटर - ५००
रोटाव्हेटर - ६००
सरी पाडणी - २००
बियाणे - १५००
लागवड - ३००
निंदण - ४०००
डवरणी - १०००
खते - ४०००
कीडनाशक फवारणी - ३०००
वेचणी - ५००० ते ६०००
इतर - १०००
एकूण खर्च - २२,५००

कापूस एकरी उत्पादन - ८ ते १० क्विंटल
सध्याचा दर- १८०० ते २००० रुपये

प्रतिक्रिया
या हंगामात लागवड केलेल्या कापसाची वेचणी सुरू केली आहे. वेचणी झालेल्या कापसामध्ये मोठ्या प्रमाणात कवडी येत आहे. दरवर्षीपेक्षा यंदा झाडांवर आधीच पंचवीस ते तीस टक्के मालाची कमतरता आहे. 
- गणेशराव नानोटे, कापूस उत्पादक, निंभारा जि. अकोला. 
 


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सून मालदिवात दाखल; १ जूनलाच केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत...
भारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी...कोल्हापूर: भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात...
लॉकाडाउनमध्येही शेतकऱ्यांकडून शेतमालाची...पुणे (प्रतिनिधी)ः कोरोना टाळेबंदी मध्ये शेतमालाची...
खानदेशात साठा वाढल्याने कापूस, सरकी...जळगाव : कापसाची शासकीय खरेदी खानदेशात मागील ६ मे...
राज्यातील २८० बाजार समित्या अडचणीत;...लातूर ः राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा...
उष्णतेच्या लाटेमुळे अकोल्यात केळीचे घड...अकोला  ः जिल्ह्यात या आठवड्यात वाढलेल्या...
विदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...
राजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे  : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...
मॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
एसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...पुणे  ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन...
तंत्रज्ञान आत्मसात करीत प्रयोगशील शेतीत...अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी...
मॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
टोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक...नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा...
उन्हाच्या झळांनी काहीली वाढली पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने...
केळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...
अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...