दुष्काळ निर्मूलनासाठी हवा ‘मास्टर प्लॅन’ : प्रा. देसरडा

प्रा. देसरडा
प्रा. देसरडा

पुणे : राज्यातील कायमस्वरुपी दुष्काळ निर्मूलनासाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार करून, त्याचा अंमलबजावणीसाठी गावपातळीवर नियोजन व देखरेख समित्या स्थापन करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्‍ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. एच. एम. देसरडा यांनी केली आहे.  राज्यातील दुष्काळ निवारणाच्या नावाखाली अब्जावधी रुपये खर्च केले जात आहे. मात्र दुष्काळ निर्मूलन होताना दिसत नाही. दुष्काळाची कारणे ही, सरकारची चुकीची शेती पाणी आणि विकास विषयक धोरणे  व त्याच्या अंमलबजावणीमध्ये होणारा भ्रष्टाचार आहे. दुष्काळ निवारणासाठी विविध सरकारांनी लाखो कोटी रुपये खर्च केले. मात्र त्याचे फलित काय निघाले? हा प्रश्न आहे. सद्यस्थितीतील दुष्काळी परि.िस्थतीत ऊस, केळी यासारख्या पिकांना होणाऱ्या पाण्याचा वापरा बरोबर बांधकामे आणि मद्य निर्मितीच्या पाण्याचा पुरवठा थांबवला पाहिजे. पिण्याच्या पाण्यासाठी जलसाठ्यांचे व भूजलाचे आरक्षण केले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच भविष्यात राज्यात दुष्काळडपू नये, यासाठी आपत्तीचे इष्टापत्तीमध्ये रूपांतर करून दुष्काळमुक्तीसाठी नियोजन करण्याची गरज आहे. दरम्यान, शेती अरिष्टावर मात करण्यासाठी सेंद्रिय शेती हाच शाश्वत समतामूलक पर्याय असून, सेंद्रिय शेतीसाठी तेलंगणा सरकारच्या धर्तीवर हेक्टरी१० हजार रुपये अनुदान देण्याची गरज आहे. तसेच भविष्यातील साखर कारखानदारीच्या धोक्याचा संभव लक्षात घेता, शेतकऱ्यांना ऊस शेतीपासून परावृत्त करणे गरजेचे आहे, असेही प्रा. देसरडा यांनी म्हटले आहे. यासाठी सरकारने किसान बचाव, मानव बचाव, वसुंधरा बचाव अभियान राबविले पाहिजे.   ‘एकत्रित काम करता येईल’ राज्यातील दुष्काळनिवारणासाठी १९५२ साली प्रा. धनंजय गाडगीळ यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळात एस. एम. जोशी, दत्ता देशमुख, एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख यांचा स.िक्रय सहभाग होता. १९७२ च्या दुष्काळात गोदावरी परुळेकर, एन. डी. पाटील, वि. म. दांडेकर, सुलभा ब्रह्मे, बाबा आढाव यांचा सहभाग होता. या मंडळाने त्या वेळी सरकार व समाजाच्या सहकार्याने दुष्काळ निवारणाच्या कामात त्त्हवाची भूमिका बजावली. यानंतर रोजगार हमी योजनेची संकल्पना उदयास आली. याधर्तीवर सर्वसंमत व्यासपीठ तयार करून, दुष्काळ निर्मूलनासाठी एकत्र काम करता येईल, असेही प्रा. देसरडा यांनी सुचवले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com