प्रोग्रेसिव्ह पॅनेलला  काठावरचे बहुमत 

पुणे बाजार समितीमधील भुसार व्यापाऱ्यांची शिखर संस्था असलेल्या दि पूना मर्चंट चेंबरच्या १५ जागांकरिता २०२१-२३ द्विवार्षिक निवडणुकीमध्ये माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया आणि प्रवीण चोरबेले यांच्या प्रोग्रेसिव्ह पॅनेलने पंधरापैकी आठ जागा जिंकत विजय मिळवला आहे.
To the Progressive Panel The majority on the edge
To the Progressive Panel The majority on the edge

पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार व्यापाऱ्यांची शिखर संस्था असलेल्या दि पूना मर्चंट चेंबरच्या १५ जागांकरिता २०२१-२३ द्विवार्षिक निवडणुकीमध्ये माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया आणि प्रवीण चोरबेले यांच्या प्रोग्रेसिव्ह पॅनेलने पंधरापैकी आठ जागा जिंकत विजय मिळवला आहे. तर बाबा पोकर्णा पॅनेलचे सात उमेदवार निवडून आले आहेत.  निवडून आलेल्या पंधरा कार्यकारिणी सदस्यांमधून नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. निवडणुकीमध्ये ५५७ पैकी ५२१ सभासदांनी मतदान केले. त्यापैकी ५१३ मते वैध ठरली, तर ८ मते अवैध ठरली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. मकरंद आडकर, ॲड. सुहास बोरा, ॲड. आशित कांकरिया, ॲड. संकेत बोरा आणि ऑफिस सेक्रेटरी हर्षदा मोझर यांनी काम पाहिले. 

विजयी उमेदवार खालीलप्रमाणे  प्रोग्रेसिव्ह पॅनेल ः राजेंद्र बाठिया, प्रवीण चोरबेले, अजित बोरा, रायकुमार नहार, नवीन गोयल, उत्तम बाठिया, आशिष दुगड, ईश्‍वर नहार.  बाबा पोकर्णा पॅनेल ः राजेंद्र गुगळे, कुणाल ओस्तवाल, दिलीप रायसोनी, जवाहरलाल बोथरा, वालचंद संचेती, विजय मुथ्था, कन्हय्यालाल गुजराथी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com