शेतरस्त्यांअभावी थांबला प्रगतिशील गावाचा विकास

शेतरस्त्यांअभावी थांबला प्रगतिशील गावाचा विकास
शेतरस्त्यांअभावी थांबला प्रगतिशील गावाचा विकास

यवतमाळ ः पीक व्यवस्थापन, तसेच शेतीपूरक व्यवसायात पुढारलेल्या अंबोडा गावात पांदण रस्त्याअभावी शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याची दखल घेत पांदण रस्त्यांची उपलब्धता करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

महागाव तालुक्‍यात असलेल्या अंबोडा गावात रेशीम, भाजीपाला, ऊस, केळी यासारखी व्यवसाय पिके घेतली जातात. अधरपूस प्रकल्पाचे पाणी बारमाही उपलब्ध असल्याने व्यावसायिक पिके शेतकऱ्यांना घेणे शक्‍य झाले आहे. त्यासोबतच अमूल आणि रानडे डेअरीचे संकलन केंद्र गावात असल्याने दुग्धोत्पादनालादेखील चालना मिळाली. 

त्यामुळे पीक उत्पादनापासून दुग्धोत्पादनात या गावाने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. त्यामुळेच या गावाला राज्यभरातून शेतकरी भेटी देतात. कृषी विभागाच्या वतीनेदेखील अभ्यासदौरे आयोजित केले जातात. असे असताना या गावातील शेतरस्त्यांची दुरवस्था झाल्याने शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोचणे जिकिरीचे ठरते.

गावातील काही शेतरस्ते अतिक्रमित, तर काही शेतरस्त्यांची दुरुस्ती गेल्या अनेक वर्षांपासून झालेली नाही. त्यामुळे पांदण रस्त्यांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम राबविल्यास हे गाव शेतीमधील आपले पुढारलेपण आणखी सिद्ध करेल, असा विश्‍वास ग्रामस्थांनी व्यक्‍त केला. 

४८ पैकी १४ पुरस्कारांवर नोंद महागाव येथे आयोजित तालुकास्तरीय पशुपालक प्रदर्शनात ४८ पैकी १४ पुरस्कार अंबोडा गावातील पशुपालकांनी पटकाविले. यावरून गावाचे शेती क्षेत्रातील पुढारलेपण सिद्ध होत आहे.

पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांनी व्यावसायिक पीकपद्धती आत्मसात केली, परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे गावात शेतरस्त्यांची दुरुस्ती रखडली. परिणामी, वेगळेपण जपणाऱ्या या गावाची वाताहत होत आहे. शासनाने पांदणरस्त्यांचा कार्यक्रम राबवावा, अशी मागणी आहे. - अमृतराव देशमुख, कापूस उत्पादक शेतकरी, अंबोडा, ता. महागाव, जि. यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com