agriculture news in marathi project for Devni the indiginious cow developement Latur | Page 2 ||| Agrowon

देवणी गोवंश जतन करण्यासाठी प्रयत्न

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 डिसेंबर 2020

देवणी गोवंशाची संख्या कमी होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी व देवणी गोवंशाचे जतन होण्यासाठी बारामती येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक्स इंप्रूव्हमेंट ऑफ डेअरी ॲनिमल्स’ या संस्थांकडून मदतीचा हात मिळणार आहे.

लातूर : देवणी गोवंशाची संख्या कमी होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी व देवणी गोवंशाचे जतन होण्यासाठी बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र आणि ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक्स इंप्रूव्हमेंट ऑफ डेअरी ॲनिमल्स’ या संस्थांकडून मदतीचा हात मिळणार आहे. यासाठी आमदार धिरज देशमुख यांनीपुढाकार घेतला असून, संस्थेचे विश्‍वस्त रणजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

बारामती येथे ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र आणि सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक्स इंप्रूव्हमेंट ऑफ डेअरी ॲनिमल्स या बहुपयोगी प्रकल्प आहे. शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणापासून दुधाळ गायी-म्हशींच्या चांगल्या वंशावळीच्या संगोपनापर्यंतची विविध स्तरावरील कामे एकाच छताखाली येथे चालतात. शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवून ज्येष्ठ नेते शरद पवार नेहमीच आपल्या दूरदृष्टिकोनातून निरनिराळे प्रयोग राबवत असतात. त्यापैकीच हा एक प्रकल्प आहे. या प्रकल्पाला आमदार देशमुख यांनी भेट दिली.

सध्या देवणी गोवंशाची संख्या कमी होत चालली आहे. या विषयावर श्री. देशमुख आणि विश्‍वस्त रणजित पवार यांच्यात चर्चा झाली. देवणी गोवंशाचे जतन करण्याबरोबरच शेतकरी प्रशिक्षण, संशोधन, अभ्यास, खाद्य व्यवस्थापन, रोगनिदान अशा विविध स्तरांवर सहकार्य केले जाईल, असा शब्द रणजित पवार यांनी या वेळी दिला. 

शेतकऱ्यांना फायदा 
ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र आणि सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक्स इंप्रूव्हमेंट ऑफ डेअरी ॲनिमल्स यांच्या विविध स्तरावरील सहकार्यामुळे आपल्या भागातील शेतकरी, विद्यार्थी, अभ्यासक यांना फायदा होईल. शिवाय, लातूरची देवणी अशी ओळख राज्यात आणि राज्याबाहेर तयार होण्यास, दूध उत्पादन क्षेत्रात लातूर आणखी पुढे जाण्यास मदत होईल, असा विश्‍वास आमदार देशमुख यांनी व्यक्त केला.
 


इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...