Agriculture news in marathi, In the project in Nanded 82.57% water storage | Agrowon

नांदेडमधील प्रकल्पांत ८२.५७ टक्के पाणीसाठा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 सप्टेंबर 2021

नांदेड : ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम, लघू प्रकल्प, केटीवेअरसह उच्च पातळी बंधाऱ्यांत एकूण ६१५.९४ दशलक्ष घणमीटरनुसार ८२.५७ टक्के पाणीसाठा झाला आहे.

नांदेड : ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम, लघू प्रकल्प, केटीवेअरसह उच्च पातळी बंधाऱ्यांत एकूण ६१५.९४ दशलक्ष घणमीटरनुसार ८२.५७ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी यात काळात जिल्ह्यात ७५ टक्के पाणीसाठा होता, अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात जूनमध्ये दमदार सुरवात केलेल्या पावसाने मध्यंतरी २२ दिवसाची उघडीप दिली होती. यामुळे पेरण्यांची कामे खोळंबली. यानंतर जुलैमध्ये मात्र पावसाने जोरदार सुरवात केली. मागची कसर भरून काढली. दरम्यानच्या काळात काहीसा मंदावलेला पावसाने ऑगष्ट-सप्टेंबरमध्ये जोर धरला. त्यामुळे जिल्ह्यात लहान-मोठ्या नंद्यासह नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला.

या पावसामुळे खरिपातील लाखो हेक्टरवरील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात आजपर्यंत ९९३ मिलीमीटरनुसार १११.४१ टक्के पावसाची नोंद झाली.

अतिवृष्टीमुळे नांदेड शहराजवळील मोठा प्रकल्प असलेल्या विष्णुपुरीत पाण्याचा येवा वाढला. यातून जवळपास ३० हजार दशलक्ष घनमीटर पाणी नदीत सोडण्यात आले. सध्या यात शंभर टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार (बारुळ) प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरला आहे.

यासोबतच जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पांत ९८ टक्के, ८८ लघू प्रकल्पांत ९४.९४ टक्के, नऊ उच्च पातळी बंधाऱ्यांत ४१.३६ टक्के असा एकूण ६१५.९४ दशलक्ष घनमीटरनुसार ८२.५७ टक्के पाणीसाठा झाला आहे. नांदेड जिल्ह्याशेजारी असलेल्या परभणी जिल्ह्यातील येलदरी व सिद्धेश्‍वर तसेच यवतमाळ जिल्ह्यातील ऊर्ध्व पेनगंगा (इसापूर) हे मोठे प्रकल्प पूर्ण क्षमनेते भरले. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील लाभ क्षेत्राला यंदा रब्बीमध्ये पूर्ण पाणी पाळ्या मिळणार आहेत.


इतर बातम्या
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी... पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर...
स्वाभिमानी-कारखानदार संघर्ष अटळ;  ‘...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त,...
पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू...पुणे : कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून...
सोयीच्या लोकांची प्रकरणे  सोमय्या झाकून...पुणे : राज्यात एकूण ४३ कारखान्यांची विक्री...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
नगर जिल्ह्यात रब्बीची  सहा टक्के पेरणी  नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीची ६...
रब्बीत यंदाही राहणार  हरभऱ्याचाच...अकोला : लवकरच रब्बीची लागवड सुरू होत आहे. या...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
धुळे जिल्हा बँकेत तिघे जण बिनविरोधधुळे ः धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची १७ जागांसाठी...
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ...बुलडाणा : विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील कापूस,...
`तंत्रज्ञान पोहोचविण्यात कृषी...हिंगोली  ः ‘‘कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान...
नांदेड जिल्ह्यात ग्रामबीजोत्पादनात सात...नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहा हजार ३१...
यवतमाळ :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ...आर्णी, यवतमाळ : परतीच्या पावसाने खरीप पिकांची...