agriculture news in marathi, project officer suspended of caim project, mumbai, maharashtra | Agrowon

तत्कालीन प्रकल्प अधिकारी ‘केम’ गैरव्यवहारप्रकरणी निलंबित
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 जून 2019

मुंबई : विदर्भातील सहा जिल्ह्यांतील कृषी समृद्धी समन्वयित प्रकल्पात (केम) झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन प्रकल्प अधिकारी गणेश चौधरी यांना निलंबित केल्याची घोषणा पणनमंत्री राम शिंदे यांनी बुधवारी (ता. १९) विधानसभेत केली. 

मुंबई : विदर्भातील सहा जिल्ह्यांतील कृषी समृद्धी समन्वयित प्रकल्पात (केम) झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन प्रकल्प अधिकारी गणेश चौधरी यांना निलंबित केल्याची घोषणा पणनमंत्री राम शिंदे यांनी बुधवारी (ता. १९) विधानसभेत केली. 

विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम आणि वर्धा या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध योजना व प्रत्यक्ष लाभ स्वरूपात या कृषी समृद्धी समन्वयित प्रकल्प (केम) राबविण्यात येत आहे. या प्रकल्पावर १०८ कोटी खर्च झाले. या आत्महत्याग्रस्त सात जिल्ह्यांत राबविण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या विविध कामांत गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले होते. या प्रकल्पात सुमारे दहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

या चौकशीत काय आढळून आले आहे आणि चौकशीच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यावर काय कारवाई केली, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला होता. 

त्यानंतर केमचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी गणेश चौधरी यांचे निलंबन केल्याची घोषणा मंत्री शिंदे यांनी केली. तसेच केम प्रकल्पात २०१६-१७ मध्ये प्रकल्पातील कामांमध्ये वित्तीय अनियमितता झाली आहे. संपूर्ण प्रकल्पात सहभागी असलेल्या शासकीय अधिकारी, प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलेल्या व्यक्ती, संस्था व खासगी व्यक्ती यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक यांच्यामार्फत उघड चौकशी सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

इतर ताज्या घडामोडी
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...
परभणीत वांगी ८०० ते १५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘...अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही...
परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा...
अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का...अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
सातारा जिल्हा परिषदेचा १०० कोटींचा...सातारा : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मूळ...
पुण्यात पीकविम्यासाठी शिवसेना रस्त्यावरपुणे ः ‘कोण म्हणतो देणार नाय विमा घेतल्याशिवाय...
पुणे विभागातील कोरडवाहू पट्ट्यात टंचाई...पुणे : विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उतरविला १...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गंत खरिपासाठी...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १५ चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील घटलेली चारा छावण्यांची...
अचूक पीक पेरणी अहवाल देणे शक्य नाही ः...बुलडाणा  ः जिल्ह्यातील पीक पेरणीचा...
आडसाली ऊस लागवडीला कोल्हापूर जिल्ह्यात...कोल्हापूर  : जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात...
परभणी कृषी विद्यापीठ उत्पादित अडीच हजार...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...