agriculture news in marathi, projects dry in Wardha district | Agrowon

वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांत ठणठणाट

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 मार्च 2019

वर्धा : जिल्हयातील १३ जलाशयांची पातळी सातत्याने खालावत असल्याने भविष्यात मोठ्या जलसंकटाचा सामना करावा लागण्याची शक्‍यता आहे. सध्या प्रकल्पात केवळ १३.४३ टक्‍केच उपयुक्‍त जलसाठा आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाने संबंधित विभागांना दिल्या आहेत. 

वर्धा : जिल्हयातील १३ जलाशयांची पातळी सातत्याने खालावत असल्याने भविष्यात मोठ्या जलसंकटाचा सामना करावा लागण्याची शक्‍यता आहे. सध्या प्रकल्पात केवळ १३.४३ टक्‍केच उपयुक्‍त जलसाठा आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाने संबंधित विभागांना दिल्या आहेत. 

या वर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद जिल्ह्यात झाली. परिणामी प्रकल्पही पूर्ण भरले नाहीत. धान नदी प्रकल्पातील पाण्याचा पुरवठा आंजी (मोठी) या गावासह वर्धा शहर आणि शेजारील गावांना केला जातो. मागील महिन्यात सुकळी प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा पुरवठा त्या ठिकाणी करण्यात आला. परंतु, सध्या या प्रकल्पासह मदन प्रकल्पांत उपयुक्‍त जलसाठा निरंक अाहे. ते कोरडे पडले आहेत.

आजच्या घडीला धाम प्रकल्पात केवळ ४.८६ टक्‍केच उपयुक्‍त जलसाठा आहे. या पाण्याचे बिगर सिंचनासाठी नियोजन करण्यात आले आहे. उपलब्ध पाणी जून २०१९ अखेरपर्यंत पुरवायचे असल्याने प्रशासनाकडून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना केल्या जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील पाण्याबाबत काटकसर करण्यासंबंधीचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात पाणीबाणी जाहीर होण्याची शक्‍यता आहे.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
संत्रा, मोसंबी पिकातील फळगळीची कारणेसंत्रा, मोसंबी फळबागांमध्ये नैसर्गिक परिस्थिती,...
लक्षात घ्या चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्मजमिनीत मुक्त चुना वेड्यावाकड्या खड्यांच्या आणि...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५००...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सीताफळातील बहार व्यवस्थापनफेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाण्याची उपलब्धता...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशतअमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा...