Agriculture news in marathi; Projects in Jalgaon District | Agrowon

जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे होण्याच्या मार्गावर
टीम अॅग्रोवन
रविवार, 23 जून 2019

जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून साडेनऊ टक्केही साठा नसल्याचे चित्र आहे. गिरणा, वाघूर व हतनूरमधील जलसाठा संपण्याच्या स्थितीत आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात पारोळा, जामनेर, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव भागांतील प्रकल्प कोरडेठाक आहेत. 

जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून साडेनऊ टक्केही साठा नसल्याचे चित्र आहे. गिरणा, वाघूर व हतनूरमधील जलसाठा संपण्याच्या स्थितीत आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात पारोळा, जामनेर, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव भागांतील प्रकल्प कोरडेठाक आहेत. 

जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्‍यात सातपुडा पर्वतालगत सुकी, अभोरा व मंगरूळ प्रकल्पांत अनुक्रमे ४०, ४५ व ४० टक्के जलसाठा आहे. यावलमधील मोर प्रकल्पातील साठा १४ टक्‍क्‍यांपर्यंत आला आहे. चोपडा व धुळे जिल्ह्यातील शिरपूरच्या सीमेवरील अनेर प्रकल्पात सुमारे ३५ टक्के जलसाठा आहे. चोपड्यातील गूळ प्रकल्पातही साठा १५ टक्केच आहे. जामनेरातील तोंडापूर, पाचोऱ्यातील बहुळा, चाळीसगावमधील मन्याड, पारोळामधील बोरी, एरंडोलातील अंजनी हे प्रकल्प कोरडेठाक आहेत. हिवरा व अग्नावती प्रकल्पातील साठाही अनुक्रमे १ व ५ टक्केही राहिलेला नाही. 

धुळ्यात शिंदखेडा व धुळे तालुक्‍यांत स्थिती बिकट आहे. तर नंदुरबारात नंदुरबार, नवापूर भागातील प्रकल्प कोरडे आहेत. हतनूरमधील जिवंत साठा संपला आहे. हतनूर प्रकल्पावर जळगावमधील औद्योगिक वसाहत, भुसावळ शहर, रेल्वेच्या वसाहती, दीपनगर येथील औष्णीक वीजप्रकल्प आदी बाबींना पाणीपुरवठा करण्याचा भार आहे. गिरणा प्रकल्पातील साठाही १० टक्‍क्‍यांखाली आहे. तर वाघूरमधील साठाही १२ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला आहे. गिरणा प्रकल्पातून पाचवे आवर्तन सोडण्याची मागणी शेतकरी, ग्रामस्थ करीत आहेत.

धुळे जिल्ह्यात करवंद, मालनगाव प्रकल्पांतील साठा ३१ टक्‍क्‍यांखालीच आहे. तापी नदीवरील सुलवाडे बॅरेजमधील साठा ३० टक्‍क्‍यांवर आहे. बुराई प्रकल्प कोरडाठाक आहे. पांझरा प्रकल्पातील साठाही ३० टक्‍क्‍यांखाली आहे. नंदुरबारमधील दरा प्रकल्प कोरडाठाक झाल्याची स्थिती आहे. तापी नदीवरील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमध्ये जलसाठा ४० टक्‍क्‍यांपर्यंत असल्याची माहिती मिळाली. मध्यम व मोठ्या प्रकल्पांमधील एकूण साठा साडेनऊ टक्‍क्‍यांखाली आला आहे. लहान तलाव, लहान प्रकल्प कोरडे झाल्याचे चित्र आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...