Agriculture news in marathi; Projects reached through Nagpur district | Agrowon

नागपूर जिल्ह्यातील प्रकल्पांनी गाठला तळ

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जून 2019

नागपूर  ः मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या साऱ्यांचीच निराशा झाली आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढती असल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांनी तळ गाठला आहे. इतकेच नव्हे, तर जिल्ह्यातील भूजल पातळी ०.६८ मीटरने म्हणजेच सव्वादोन फुटांनी खाली गेली असून, त्यामुळे देखील परिस्थिती आणखी विदारक झाली आहे. येत्या काही दिवसात मॉन्सून न बरसल्यास जिल्ह्यात पाणीबाणीची स्थिती निर्माण होण्याची भीती वर्तविली जात आहे. 

नागपूर  ः मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या साऱ्यांचीच निराशा झाली आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढती असल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांनी तळ गाठला आहे. इतकेच नव्हे, तर जिल्ह्यातील भूजल पातळी ०.६८ मीटरने म्हणजेच सव्वादोन फुटांनी खाली गेली असून, त्यामुळे देखील परिस्थिती आणखी विदारक झाली आहे. येत्या काही दिवसात मॉन्सून न बरसल्यास जिल्ह्यात पाणीबाणीची स्थिती निर्माण होण्याची भीती वर्तविली जात आहे. 

नागपूर विभागात एकूण १८ मोठी धरणे आहे. त्यांची एकूण पाणीक्षमता २९६४.४३ दलघमी इतकी आहे. या प्रकल्पात आजच्या घडीला केवळ १८३.७८ दलघमी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यात नागपूर जिल्हयातील पाच मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. या पाचपैकी तोतलाडोह व लोवर वणा हे प्रकल्प कोरडे पडले आहेत. तोतलाडोह प्रकल्पाचा साठा १०१६ दलघमी इतका आहे. लोवर धरणा प्रकल्पची क्षमता ५३ दलघमीची आहे. या दोन्ही प्रकल्पांत शून्य टक्‍के इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील इतर धरणांचीस्थिती देखील यापेक्षा वेगळी नाही. कामठी खैरी येथील धरणातील पाणीसाठ्याची क्षमता १४१.७४ दलघमी इतकी आहे. या प्रकल्पात केवळ ३३.६३ दलघमी म्हणजेच २४ टक्‍के इतकाच साठा शिल्लक आहे. रामटेक धरणाची क्षमता १०३ दलघमी असताना या प्रकल्पात केवळ १५.१२ दलघमी इतकाच साठा उरला आहे. मोठ्या प्रकल्पांसोबतच मध्यम प्रकल्पांची स्थितीदेखील वाईट आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण १३ मध्यम प्रकल्प आहेत. याची एकूण पाणीसाठा क्षमता २००.६ दलघमी इतकी आहे. त्यात १३  जून पर्यंत केवळ १८.२२ दलघमी इतकाच साठा शिल्लक होता. नागपूर शहरातील प्रसिद्ध गोरेवाडा तलाव कधीच आटलेला दिसला नाही. या वर्षी या मात्र हा तलाव कोरडाठण पडला आहे. हा तलाव १०० वर्ष जुना आहे. 

 हे प्रकल्प पडले कोरडे
नागपूर विभागात या वर्षी भीषण दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या पाच वर्षांत अशाप्रकारची भयावह परिस्थिती निर्माण झाली नसल्याचे सांगितले जाते. विभागातील एकूण १८ मोठ्या प्रकल्पांपैकी तोतलाडोह, नांद, दीना, पोथरा, गोसेखुर्द, टप्पा १ व बावनथडी प्रकल्प कोरडे पडले आहेत. 


इतर बातम्या
`बॅलन्स`अभावी शेतकऱ्याला दिलेला चेक...अकोला ः अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई...
मराठवाड्यात कपाशीची ८० टक्के पेरणीऔरंगाबाद :  सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत...
पेरणीसाठी ‘बीबीएफ’ तंत्राचा वापर करा :...औरंगाबाद : ‘‘बीबीएफ टोकण यंत्राचा वापर वेगवेगळी...
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा...जालना  : ‘‘शेतकऱ्यांनी शेतीत आधुनिक...
हतनूर धरणाची साठवण क्षमता घटलीभुसावळ, जि. जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख सिंचन...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंका पीक...जळगाव ः केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
खानदेशात सर्वदूर पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात पेरणी ८८ टक्‍क्‍यांवर पोचली असून...
रिसोड बाजार समितीत हळदीची दोन दिवस खरेदीअकोला ः गेल्या काही वर्षांत वाशीम तसेच अकोला...
नगर जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर पेरानगर ः यंदा रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्रांमध्ये...
जुन्नरमध्ये निकृष्ट बियाणेप्रकरणी...पुणे ः यंदा खरीप हंगामात निकृष्ट दर्जाचे बियाणे...
सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पेरणी वाया...सांगली : जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून...
रत्नागिरी जिल्ह्यातील भाजीपाला,...रत्नागिरी : कोरोना टाळेबंदीत जिल्ह्यातील महिला...
परभणीत २५ हजारांवर शेतकऱ्यांची कापूस...परभणी  : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
अकोला जिल्ह्यात पीक कर्जापासून ५२ टक्के...अकोला ः खरीप हंगामाला सुरुवात झाली असून,...
परभणी जिल्ह्यात ७४.४३ टक्के पेरणीपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात शुक्रवार...
बियाणे भरपाई दिलेल्या शेतकऱ्यांची नावे...नागपूर ः आपल्या सत्ताकाळात निकृष्ट बीटी...
पाऊस नसल्याने संरक्षित पाण्यावर भातलागवडनाशिक : जिल्ह्यातील अतिपर्जन्य छायेखालील इगतपुरी...
संशोधनातून शेतकऱ्यांना डिजिटल शेतीसाठी...परभणी : ‘‘विविध विषयातील शास्त्रज्ञांनी एकत्र...
सोयाबीन बियाणेप्रकरणी ३० हजार तक्रारी ः...यवतमाळ : सोयाबीन बियाणे उगवणाबाबत मोठ्या प्रमाणात...
जनहितचे धरणे अन् तत्काळ शेतकऱ्यांच्या...सोलापूर  ः मोहोळ तालुक्यातील ऑक्टोबर -...