Agriculture news in marathi Projects in Sangli district have 27% more water than last year | Agrowon

सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांत गेल्या वर्षीपेक्षा २७ टक्के अधिक पाणी

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 जुलै 2020

सांगली :यंदा जिल्ह्यातील तिन्ही उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनातून अनेक तलाव पाण्याने भरले. यामुळे गतवर्षीपेक्षा जूलैच्या प्रारंभी २७ टक्क्यांनी पाणीसाठा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघू ८४ प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता ७ हजार ८५३ दश लक्ष घनफूट इतकी आहे. सध्या २ हजार ४८० दशलक्ष घन फूट इतका म्हणजे ३२ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी जूलैच्या प्रारंभी हाच पाणीसाठा ५ टक्के इतका होता. यंदा जिल्ह्यातील तिन्ही उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनातून अनेक तलाव पाण्याने भरले. यामुळे गतवर्षीपेक्षा जूलैच्या प्रारंभी २७ टक्क्यांनी पाणीसाठा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

जिल्ह्यात मध्यम प्रकल्प पाच, तर लघू प्रकल्प ७९ असे एकूण ८४ प्रकल्प आहेत. दरवर्षी प्रकल्पांतील पाणीसाठा कमी होतो. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यात पाणी टंचाई भासते. त्यामुळे पिण्यासह शेतीच्या पाण्यासाठी जनतेला वणवन भटकंती करावी लागते. गेल्यावर्षी जिल्हाभर दमदार पाऊस झाला. त्यामुळे सर्व प्रकल्प शंभर टक्के भरले होते. त्यामुळे पाणीसाठा कमी झाला नाही. यंदा जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाणी उपलब्ध होते. त्यामुळे टॅंकरही सुरु झाले नाहीत. 

दरम्यान, ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनांचे उन्हाळी आवर्तन सुरु होते. या योजनेच्या माध्यमातून आटपाडी, तासगाव, खानापूर, मिरज, कवठेमहांकाळ, जत तालुक्यातील योजनेच्या माध्यमातून मध्यम आणि लघू प्रकल्प भरुन दिले. त्यामुळे पाण्याची उपलब्धता असल्याने पाण्याची टंचाई भासली नाही. 

जत तालुक्यात २८ प्रकल्पांची संख्या आहे. या प्रकल्पांत ७ टक्के पाणीसाठा आहे. त्यांपैकी ८ प्रकल्प कोरडे असून ७ प्रकल्पांत मृत पाणीसाठा आहे. एका प्रकल्पात ७५ टक्के, तर, ७ तलावांत ५० टक्के पाणीसाठा आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याची उबलब्धता असल्याने द्राक्ष, डाळिंब पिकासह अन्य पिकांना पाण्याची कमतरता पडली नाही. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सततच्या पावसाने मुगाचे...नगर  ः नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून...
नांदेड जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टरवर...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील खरिपाच्या पेरणी...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी पट्टा...पुणे  ः चालू वर्षी खरीप हंगामात ड्रम सीडर...
दोंडाईचा मालधक्क्यावर अधिकाऱ्यांच्या...धुळे ः युरिया वितरणातील घोळ, शेतकऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यात फळबाग लागवड वाढण्याचा...नगर  ः यंदा पाऊस चांगला, शिवाय मागील काही...
कोल्हापुरात अर्धा टक्के शेतकऱ्यांनी ...कोल्हापूर : राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेला...
रत्नागिरी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाची...रत्नागिरी  ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
अकोला जिल्ह्यातील दोन लाखांवर ...अकोला  : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
नागपूर कृषी महाविद्यालय राबवणार ‘ई-...नागपूर  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन...
उभ्या पिकात मूलस्थानी जलसंवर्धनकोरडवाहू शेतीमध्ये जमिनीतील पाण्याची कमतरता पाहता...
दूध प्रश्न बाजूला; शेतकरी संघटनांमधील...कोल्हापूर  : दूध दरप्रश्नी सरकारवर दबाव...
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
घरोघरी असावी पोषण परसबागपरसबागेचा आकार हा जागेची उपलब्धता, कुटुंबातील...
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक;...मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या...
अपचन, खोकला, कफावर गुणकारी पिंपळी पावडर आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना पिंपळी नक्कीच...
मागण्यांसाठी मराठवाड्यात दूध...औरंगाबाद : दूध उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारा...
नैसर्गिकरीत्या वाढवा रोगप्रतिकारक शक्तीरोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच शरीरात बाहेरून प्रवेश...
परभणी जिल्ह्यात रास्ता रोको, दूध संकलन...परभणी : दूध दरवाढीसाठी भाजपतर्फे शनिवारी (ता.१)...
दूध दरप्रश्नी आंदोलनाला विदर्भात...नागपूर : दूध दरप्रश्नी भाजपच्या वतीने...
दूध दरप्रश्नी भाजपचे सातारा जिल्ह्यात...सातारा  : गाईच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये...