साताऱ्यातील प्रकल्पांसाठी ५८८ कोटी रुपयांची तरतूद

सातारा : जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांसाठी बळिराजा सिंचन योजना, पंतप्रधान कृषी सिंचन योजना व राज्याच्या अर्थसंकल्पातून प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
Onion price improvement in Khandesh
Onion price improvement in Khandesh

सातारा : जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांसाठी बळिराजा सिंचन योजना, पंतप्रधान कृषी सिंचन योजना व राज्याच्या अर्थसंकल्पातून प्रकल्पांसाठी  निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांच्या कामांसाठी एकूण ५८८ कोटींच्या निधीची तरतूद आहे. यामध्ये उरमोडीसाठी १०० कोटी, तर जिहे-कठापूरसाठी १३० कोटींची सर्वाधिक तरतूद आहे.  

जिल्ह्यात प्रकल्प उभारण्यात आले. परंतु, अद्यापपर्यंत पूर्ण क्षमतेने पाणी पोचलेले नाही. अद्यापही बहुतांशी प्रकल्प अपूर्णच आहेत. बहुतांशी धरणांची कामे पूर्ण झाली आहेत. पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होत आहे. तर उपसा सिंचन योजनांची कामे निधीअभावी रखडली आहेत. जिल्ह्यात पाच मोठे, तीन मध्यम, तर चार उपसा सिंचन योजना आहेत. या योजनांसाठी यंदा अर्थसंकल्पात निधीची मोठी तरतूद केली आहे. चार प्रकल्पांसाठी २०५ कोटी, लहानांसाठी २० कोटी, मोठ्या व मध्यम प्रकल्पांसाठी ३६१ कोटी आहेत. 

प्रमुख सात मोठ्या, इतर लहान प्रकल्पांसाठी ५८८ कोटींची तरतूद आहे. उरमोडी प्रकल्पासाठी १०० कोटी, जिहे-कठापूर योजनेसाठी १३० कोटींचा समावेश आहे. धोम-बलकवडी योजनेस ३६ कोटी, कुडाळी योजनेस ७४ कोटी, वांग-मराठवाडी प्रकल्पास ५२ कोटी, वारणा-गुरेघर प्रकल्पासाठी ११ कोटी, हणबरवाडी ४० कोटी, धनगरवाडी ३५ कोटी रुपये आहेत. इतर प्रकल्पांसाठी २० कोटी आहेत. कृष्णा प्रकल्पाच्या कामांसाठी १७ कोटी आहेत. 

दिरंगाईमुळे किमती वाढल्या

अपूर्ण प्रकल्प मार्गी लागण्यासाठी प्रत्येक वर्षी निधीची तरतूद होत आहे. पण, कामांना वेळ लागत असल्याने प्रकल्पांची किंमत वाढत आहे. राज्य सरकारनेही प्रकल्पांच्या कामांसाठी निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे जिल्ह्याला भरीव निधी उपलब्ध झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com