वऱ्हाडातील प्रकल्प वधारण्यास सुरवात

वऱ्हाडातील प्रकल्प वधारण्यास सुरवात
वऱ्हाडातील प्रकल्प वधारण्यास सुरवात

अकोला ः वऱ्हाडातील प्रकल्पांमध्ये साठा वाढत आहे. यात काटेपूर्णा प्रकल्पाची क्षमता ३४७.७७ दलघमी असून, शुक्रवारी (ता.९) यात ३.२७ दलघमी साठा आहे. हा साठा अवघा ३.७९ टक्के एवढा आहे. अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पात ८०.७४ टक्के साठा असून, या प्रकल्पाची ४१२ दलघमी क्षमता आहे. सध्या ४०८.३१ दलघमी साठा झालेला आहे. या प्रकल्पाचे सहा गेट १ मीटरने उघडण्यात आल्याने वान नदीला पूर आलेला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्प ११.१५ दलघमी साठा झालेला आहे. सरासरीच्या ११.१५ टक्के हा साठा आहे. पेनटाकळीमध्ये  ३०.५९ दलघमी साठा असून, त्याची टक्केवारी ५१.०१ आहे.   वऱ्हाडातील मध्यम प्रकल्पांमध्येही साठा वाढत आहे. यात अकोल्यातील मोर्णा प्रकल्पात सध्या ६.३४ दलघमी साठा आहे. उमा प्रकल्पात मात्र आता साठा व्हायला सुरवात झाली. घुंगशी बॅरेज अद्याप कोरडे आहे. वाशीम जिल्ह्यातील अडाण प्रकल्पातही साठा कमी आहे. सध्या यात अवघा ४.३४ दलघमी साठा असून, त्याची ६.४५ एवढी टक्केवारी आहे. सोनल ०.४० दलघमी (२.३६ टक्के), एकबुर्जी ३.४७ दलघमी (२८.९९ टक्के), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा प्रकल्पात २१.३१ दलघमी (६२.८१टक्के), पलढग ७.५१ दलघमी (१०० टक्के), मस ११.१८ दलघमी (७४.३४ टक्के) कोराडी प्रकल्प कोरडा आहे. मनमध्ये १३.७६ दलघमी (३७.३६ टक्के), तोरणा ३.६५ दलघमी (४६.२६ टक्के), उतावळीमध्ये ६.५४ दलघमी (३३.५ टक्के) साठा झालेला आहे.  संग्रामपूरने वार्षिक सरासरी ओलांडली मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने भीषण परिस्थितीला सामोरे गेलेल्या संग्रामपूर तालुक्यात या वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात वार्षिक ६३७.४ मिलिमीटर ही सरासरी ओलांडली आहे. शुक्रवारी (ता. ९) सकाळपर्यंत या ठिकाणी ६४९ मिलिमीटर पाऊस झाला असून, सरासरीच्या १०१ टक्के झाला. मागील दोन-तीन वर्षांत पहिल्यांदा या तालुक्यातील सर्वच नद्या ओसंडून वाहत आहेत. वान नदीपात्र दुथडी भरून वाहत असून, ठिकठिकाणच्या पुलांवर अनेक तास पाणी असल्याने गावांचा संपर्क तुटला होता. या नदीवर असलेल्या वान प्रकल्पाचे सहा गेट उघडले असून, त्या पाण्याचाही विसर्ग नदीद्वारे होत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com