शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता व्हावी ः मुंडे

नांदेड: ‘‘शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये देण्याचे आश्वासन देणाऱ्या ठाकरे सरकारनेत्याची पूर्तता करावी’’,असे प्रतिपादन पंकजा मुंडे यांनी केले.
Promises made to farmers should be fulfilled: Munde
Promises made to farmers should be fulfilled: Munde

नांदेड : ‘‘शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये देण्याचे आश्वासन देणाऱ्या ठाकरे सरकारने त्याची पूर्तता करावी’’, असे प्रतिपादन पंकजा मुंडे यांनी केले. 

अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय सचिव पंकजा मुंडे नांदेड दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी नांदेड आणि लोहा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी त्यांनी केली. 

शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देणार आहोत. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. हे नुकसान भरून निघणे शक्य नाही. मात्र, सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन शेतकऱ्यांना तत्काळ विनाअट मदत करा, अशी मागणी त्यांनी  केली.

लोहा तालुक्यातील पारडी, धनगरवाडी येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. यावेळी आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com