पंतप्रधान मुद्रा बँक योजनेचा प्रचार सर्व स्तरांवर करा

पंतप्रधान मुद्रा बँक योजनेचा प्रचार सर्व स्तरांवर करा
पंतप्रधान मुद्रा बँक योजनेचा प्रचार सर्व स्तरांवर करा

कोल्हापूर : पंतप्रधान मुद्रा बँक योजनेचा ग्रामीण दुर्गम भागातील गरजू आणि होतकरू व्यक्तीपर्यंत होण्याच्या हेतूने या योजनेचा प्रचार बँका, शासकीय कार्यालये, ग्रामपंचायती, नगरपंचायती अशा सर्व स्तरांवर करा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.

पंतप्रधान मुद्रा बँक योजना जिल्हा समन्वय समितीची बैठक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीला समितीचे जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक राहुल माने, अशासकीय सदस्य अर्चना रिंगणे, नचिकेत भुर्के, तानाजी ढाले, नामदेव चौगुले, नाथ देसाई आदी उपस्थित होते. जिल्ह्यासाठी या योजनेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी २१ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. याबाबत विविध माध्यमातून प्रसिद्धी करण्यात येणार असल्याचे श्रीमती यादव यांनी सांगितले.

जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्री. माने यांनी २०१७ पासून या योजनेअंतर्गत जिल्ह्यात वाटप झालेल्या कर्जाची माहिती दिली. २०१६-१७ साठी ३१ हजार १०२ लाभार्थ्यांना ६२१ कोटी ७६ लाख कर्ज वितरण करण्यात आले आहे. २०१७-१८ साठी ३६ हजार ८१३ लाभार्थ्यांना ६३९ कोटी ४ लाख कर्ज वितरण करण्यात आले आहे. २०१८-१९ साठी ३५ हजार ४९३ लाभार्थ्यांना ६३२ कोटी ७८ लाख कर्ज वितरण करण्यात आले आहे. २०१९-२० साठी १९ हजार ५५५ लाभार्थ्यांना १५३ कोटी ९३ लाख कर्ज वितरण करण्यात आले आहे. 

जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, ‘‘नगरपंचायती, नगर परिषद, ग्रामपंचायत, सर्व शासकीय कार्यालये या ठिकाणी पंतप्रधान मुद्रा बँक योजनेची माहिती देणारे फलक प्रदर्शित करावेत. सर्व बँकांच्या दर्शनी भागात लावावेत. फलक, आकाशवाणी, एफएम वाहिन्या यावरुनही या योजनेची प्रसिद्धी करावी. कलापथक, कॉफी टेबल बुक त्याचबरोबर स्थानिक केबल वाहिन्यावरून योजनेची प्रभावीपणे प्रसिद्धी करावी. बँकांनीही या योजनेच्या लाभार्थ्यांना सविस्तर माहिती द्यावी.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com