agriculture news in marathi Promoting onion exports Grant: Gaikwad | Agrowon

कांदानिर्यातीला प्रोत्साहन अनुदान द्या ः गायकवाड

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 मार्च 2021

नगर ः राज्यात अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कांद्याला चांगला दर मिळणे गरजेचे आहे.

नगर ः राज्यात अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कांद्याला चांगला दर मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी अनुदान द्यावे. त्यासाठी पुढाकार घ्यावा, याबाबत पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे निवेदन दिले.  

निवेदनानुसार, राज्यात झालेल्या अतिवृष्टीने कांदा पिकाचे नुकसान झाले. जो कांदा आला, त्याला भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे कांद्याला चांगला दर मिळणे गरजेचे आहे. कांद्याची निर्यात झाली तरच चांगला दर मिळेल. राज्यातील रब्बी हंगामातील कांदा लागवड गतवर्षीच्या तुलनेत दोन लाख हेक्‍टरने वाढून चार लाख हेक्‍टरपर्यंत गेली आहे. त्यामुळे रब्बी हंगामात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे  कांद्याचे दर १५ ते १८ रुपयांवर आले आहेत. ते अजूनही घसरण्याची शक्‍यता आहे. 

निर्यातीसाठी कंटेनरचे भाडे वाढले आहे. त्यासाठी निर्यातीला अनुदान दिले, तर शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो, त्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन कांदा  निर्यातीला प्रोत्साहन अनुदान  मिळवून द्यावे, असे गायकवाड यांनी निवेदनात म्हटले आहे. 

पवार पुढाकार घेणार

दरम्यान, मंगळवारी (ता.१६) दिल्लीत वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करणार आहे. कांद्याला निर्यात अनुदान मिळावे, यासाठी स्वतः पुढाकार घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे. 


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...